Yavatmal Crime : यवतमाळच्या हायप्रोफाइल भागात सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकली, दृश्य बघून सगळेच हैराण

Yavatmal News : यवतमाळ शहरात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा प्रकार उघडकीस आला आहे. संशय येऊ नये अशा पद्धतीने शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गेडामनगरातील भरत कॉलनीमध्ये हा अवैध धंदा चालविला जात होता
Yavatmal Crime
Yavatmal CrimeSaam tv
Published On

संजय राठोड 
यवतमाळ
: यवतमाळ शहरातील उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गेडामनगर येथील भरत कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पश्चिम बंगाल येथील महिलेसह चौघांना अटक करण्यात आली असून मुख्य दलाल विजय निरतवार याच्यासह अन्य आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

यवतमाळ शहरात पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा प्रकार उघडकीस आला आहे. कोणाला संशय येऊ नये अशा पद्धतीने शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या गेडामनगरातील भरत कॉलनीमध्ये हा अवैध धंदा चालविला जात होता. यवतमाळ शहरात यापूर्वी देखील अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान भरत कॉलनी परिसरातील या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली आहे. 

Yavatmal Crime
Heat Wave : उष्णतेचा कहर; राज्यातील अनेक शहरातील तापमान ४० अंशाच्या वर

पश्चिम बंगालमधील महिलेचाही समावेश 

शहर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भरत कॉलनी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. त्यानुसार शहरातील भरत कॉलनी परिसरात सुरू असलेल्या या रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात पश्चिम बंगालच्या महिलेचा देखील यात सहभाग असून त्या महिलेला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Yavatmal Crime
Onion Price : कांद्याच्या दरात मोठी घसरण; उत्पादक शेतकरी अडचणीत

दलालही पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान वेश्याव्यवसाय चालविण्यामध्ये दलाल विजय निरतवार याचा या प्रकारात प्रमुख सहभाग असल्याचे समोर आला आहे. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. उच्चभ्रू वस्तीत सेक्स रॅकेट सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com