Bomb Blast At Quetta Railway Station Saam Tv
देश विदेश

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरले! क्वेटा रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट, २१ जणांचा मृत्यू

Bomb Blast At Quetta Railway Station: क्वेटा रेल्वे स्थानकावर आज सकाळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटामध्ये अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Priya More

पाकिस्तानमध्ये स्फोटाची मोठी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा रेल्वे स्थानकावर शनिवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉम्बस्फोटावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या स्फोटाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट रेल्वे स्टेशनवरील बुकिंग कार्यालायत झाला. ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहचण्यापूर्वी हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीने घेतली आहे. रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, जाफर एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता पेशावरसाठी रवाना होणार होती. स्टेशनवर मोठी गर्दी होती त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही घटना आत्मघाती हल्लासारखी वाटत आहे.

या स्फोटामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. घटनास्थळावर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पोलिसांकडून या स्फोटाचा तपास सुरू आहे. दावा केला जात आहे की, क्वेटामध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले. पहिल्या स्फोटामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या स्फोटामध्ये १५ ते २६ जणांच मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय येथे फुटीरतावादी बंडखोरीही वाढत आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष सय्यद युसूफ रझा गिलानी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी सांगितले की, 'दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत. त्यांनी निरपराध लोकांना लक्ष्य केले आहे.' यावेळी त्यांनी दहशतवाद संपवण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. तर, बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT