saifullah khalid news : Saam tv
देश विदेश

Saifullah Khalid Shot Dead : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान लष्कर-ए-तोयबाला मोठा झटका; टॉपच्या दहशतवाद्याला गोळ्या झाडून संपवलं

saifullah khalid news : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान लष्कर ए तोयबाला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानात लष्कर ए तोयबाच्या टॉपच्या दहशतवाद्याला गोळ्या झाडून संपवलं आहे.

Vishal Gangurde

लष्कर ए तोयबाचा टॉपचा दहशतवाद्याचा सैफुल्लाह खालिदला पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून संपवण्यात आलं आहे. सैफुल्लाह हा दीर्घकाळापासून नेपाळमधून संघटनेचं नेटवर्क पाहत होता. सध्या सैफुल्लाह सिंध प्रातांच्या मतली, बदनीमध्ये काम करत होता. सैफुल्लाह भारतातील तीन मोठ्या हल्ल्यात सहभाग झाला होता.

सैफुल्लाह भारतातील कोणत्या हल्ल्यात सहभागी झाला होता?

महाराष्ट्रातील नागपूरच्या आरएसएस मुख्यालयात २००६ साली हल्लाचा कट रचला होता. यावेळी दहशतवादी पोलिसांचे कपडे घालून आले होते. यावेळी पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

या दहशतवाद्यांकडे AK-56 रायफल, हँड ग्रेनेड आणि आरडीएक्स सापडले होते. दहशतवाद्यांनी २००८ मध्ये उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील सीआरपीएफच्या कँपवर हल्ला केला होता.

बेंगळुरुत २००५ साली हल्ला केला होता. भारतीय विज्ञान संस्थेच्या ऑडिटोरियममधून बाहेर निघणाऱ्या लोकांवर गोळीबार करण्यात आला होता. यात एका प्राध्यापकाचा मृत्यू झाला होता. तर इतर लोक जखमी झाले होते.

सैफुल्लाह खालिद हा लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेटिव होता. लष्कर-ए-तोयबाने भारतावर हल्ला करण्यासाठी त्याला टास्क दिला होता. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नेपाळमध्ये राहत होता. सैफुल्लाह नेपाळमधून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणत होता.

भारताच्या गुप्तचर संस्थेला माहिती मिळाल्यानंतर सैफुल्लाहने नेपाळमधून पळ काढला. नेपाळमधून पळ काढत पाकिस्तान लपला. तो भारतासाठी मोस्ट वान्टेड दहशतवादी होता. सैफुल्लाह हा वेगवेगळ्या नावाने नेपाळमधून दहशतवादी कारवाया ऑपरेट करत होता. तो विनोद कुमार आणि इतर नावांचा वापर करून नेपाळमध्ये वावरत होता. याच दहशतवाद्याला पाकिस्तानात अज्ञातांनी गोळ्या झाडून संपवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT