India-Pakistan : पाकिस्तानच्या विरोधात भारताचा डिप्लोमॅटिक स्ट्राईक, VIDEO मधून समजून घ्या रणनीती

India-Pakistan Conflict : ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर भारतानं आता दुसरा सर्वात मोठा दणका देण्याचा प्लान आखला आहे.

भारताच्या लष्करानं पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार डिप्लोमॅटिक स्ट्राइक करणार आहे. दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार आहे.

भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता ‘डिप्लोमॅटिक’ पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आलीय. जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठवली जाणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे रवी शंकर आदींसह २० खासदारांची निवड झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com