Jammu Kashmir Latest News:  Saamtv
देश विदेश

Jammu-Kashmir: पाकिस्तानकडून पुंछ-राजौरीमध्ये तुफान गोळीबार, सरकारी अधिकाऱ्यासह ५ जणांचा मृत्यू

India -Pakistan War: भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. पाकिस्तानने आज सकाळी जम्मू-काश्मीरच्या पुंछ-राजौरीमध्ये तुफान गोळीबार केला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला.

Priya More

पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ रात्रीपासून तुफान गोळीबार सुरू आहे. जम्मू-काशमीरच्या राजौरी, पुंछ आणि जम्मू या जिल्ह्यामध्ये पाकिस्तानकडून सकाळपासून गोळबारा सुरू आहे. या गोळीबारामध्ये एका वरिष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीचे अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा यांच्या घरावर पाकिस्तानकडून दारूगोळा फेकण्यात आला. यामध्ये राज कुमार थापा आणि त्यांच्या घरातील दोन स्टाफ गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण राज कुमार थापा यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर इतर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'राजौरीहून एक दुःखद बातमी आहे. आपण जम्मू आणि काश्मीर प्रशासकीय सेवेतील एक निष्ठावंत अधिकारी गमावला आहे. राज कुमार थापा यांनी काल उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील व्यवस्थेचा आढावा घेतला होता आणि माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीतही ते सहभागी झाले होते.'

पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमधील कांग्रा-गल्हुट्टा गावातील एका घरावर पाकिस्ताने फेकलेले मोर्टार पडल्याने ५५ वर्षीय रशिदा बेगम यांचा मृत्यू झाला. जम्मू जिल्ह्यातील आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बिडीपूर जट्टा गावातील रहिवासी अशोक कुमार उर्फ ​​शौकी यांचा मृत्यू झाला. पुंछमध्ये झालेल्या जोरदार गोळीबारात ३ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. जम्मू शहरातील रेहारी आणि रूपनगरसह निवासी भागात दारूगोळे आणि ड्रोन हल्ल्याने अनेक जण जखमी झालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT