Pakistan Fighter Jets : श्रीनगरमध्ये भारतीय लष्कराने पाडली पाकिस्तानची 2 फायटर विमानं

Indian Army: श्रीनगरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दोन लढाऊ विमानांना खाली पाडण्याची मोठी कामगिरी केली आहे. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भारताला आणखी एकदा मोठं यश मिळालं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दहशतवाद्यांवर यशस्वी एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पंजाब, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि गुजरातमधील काही शहरांना लक्ष्य करण्यात आले होते. मात्र, भारतीय लष्कराने सजगतेने पाकिस्तानच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा हवेतच नायनाट केला. पाकिस्तानचा हा हल्ल्याचा डाव पूर्णपणे फसला असून भारताने मजबूत प्रत्युत्तर दिले आहे.

श्रीनगरमध्ये पाकिस्तान हवाई दलाची दोन विमानं पाडण्यात आली आहे. भारतीय लष्कराने ही मोठी कारवाई केली आहे. पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानची दोन विमानं पाडली आहेत. भारत सतत पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला करारा जबाब देत आहे चोख प्रत्युत्तर देत आहे. भारतीय सैनाला ही विमानं पाडण्यात मोठं यश आलेलं आहे. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक शस्त्र, प्रत्येक मिसाईल आणि ड्रोनला हवेतच नष्ट करुन टाकत आहे.

पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारताने जोरदार प्रतिहल्ला केला आहे. भारताने रावळपिंडीतील लष्करी तळ उद्ध्वस्त करत पाकिस्तानच्या १५ मोठ्या शहरांवर हल्ला चढवला. लाहोर आणि कराचीतील एअर डिफेन्स सिस्टिमही भारतीय कारवाईत नष्ट करण्यात आली आहे. या कारवाईने पाकिस्तानची मोठी हानी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com