pakistan political coup saam tv
देश विदेश

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Pakistan News : पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता एका पाकिस्तानी पत्रकारानं व्यक्त केलीय. सत्तापालट होण्यास कारण ठरलयं बिलावल भुट्टोंनी केलेलं विधानं... भुट्टो नेमकं काय म्हणाले? पाक लष्करासह, दहशतवाद्यांनी भुट्टोंविरोधात संताप का व्यक्त केलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Suprim Maskar

1977 च्या जुलै महिन्यात पाकिस्तानात जनरल झिया- उल- हक यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या सरकारला उलथवून लावत स्वत: सत्तेत आले होते. आता पुन्हा एकदा तब्बल 47 वर्षांनी पाकिस्तानात सत्तापालट होणार असल्याची चर्चा रंगलीय. त्यात बिलावल भुट्टो यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानी दहशतवादी भारताला सोपवण्यावरून खळबळजनक विधान केलंय. ज्यामुळे पाकिस्तानातील सत्तेला हादरा बसला..

मसुद अजहर आणि हाफिज सईद यांच्यावर पाकिस्तान काय कारवाई करणार? त्यांच्या गटाचे प्रमुख कोण आहेत? कारण न्यूयॉर्क टाइम्सच्या मे 2025 च्या रिपोर्टमध्ये भुट्टो म्हणालेत की हाफिज सईद हा अल्पावधीच्या अटकेनंतर मोकळा झालेला आहे. हे पूर्णपणे बरोबर नाही... तथ्य वेगळं आहे. हाफिज सईद पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मात्र मसूद अजहरला आम्ही अटक केलेली नाही किंवा तो कुठे आहे हे माहिती नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये हे दहशतवादी असल्यास आम्ही भारताला माहिती देऊ, कारण त्यांच्या अटकेनंतर आम्हालाही आनंद होईल.

बिलावल भुट्टोंच्या विधानानंतर पाकिस्तानातील दहशतवादी चांगलेच संतापलेत. हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदनं भुट्टोंवर विदेशी अजेंडा चालवत असल्याचा आरोप करत भुट्टोंच्या विधानांचा निषेध केलाय..

दरम्यान भुट्टोनं दहशतवाद्यांविरोधात भूमिका घेतल्यानं पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना हटवून चीफ मार्शल असीम मुनीर यांना पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती घोषित केलं जाण्याची शक्यता पाकिस्तानी पत्रकारानंच वर्तवलीय. तर दुसरीकडे सत्तापालट होण्याआधीच पाकिस्तानमध्ये मुनीर यांना विरोध सुरु झालाय..

पाकिस्तानात होणार सत्तापालट?

- मुनीरकडून झरदारींना हटवण्यासाठी प्रयत्न सुरु

- शरीफ कुटुंबांचीही मुनीरला मदत

- झरदारी स्वेच्छेनं पद सोडणार की त्यांना हटवणार..? याबद्दल स्पष्टता नाही

बिलावल भुट्टोंची दहशतवाद्यांना भारताला सोपवण्याची भूमिका पाक पंतप्रधान, लष्कर प्रमुख आणि तिथल्या नापाक दहशतवाद्यांना चांगलीच झोंबलीय. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये सत्तापालट होण्याची चर्चा सुरु झालीय. आता पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा जुलै महिन्यातच सत्तापालट होतो का? याकडे जगाचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : विद्यार्थ्यांची रिक्षात कोंबून वाहतूक; तपासणी करताना आमदार मिटकरींसोबत घातला वाद

Maharashtra Live News Update: - प्रांजल खेवलकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मोलकरणीनं स्वत:वर गोळी झाडली; छतावर जाऊन आयुष्य संपवलं, कारण..

Kuhoo Garg: बॅडमिंटनमध्ये १७ मेडल, नंतर एक दुखापत अन् आयुष्यच बदललं, पण आयपीएस अधिकारी होऊन अडचणींनाही झुकवलं

Ganesh Mandals Mumbai: गणेशोत्सव मंडळांवरचं विघ्न टळलं; एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर मोठी घोषणा, VIDEO

SCROLL FOR NEXT