Pakistan blast Saam Tv
देश विदेश

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

Pakistan blast: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोटामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. मशिदीमध्ये नमाज पठण करत असताना ही घटना घडली. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत.

Priya More
  • पाकिस्तानच्या कोहाटमध्ये मशिदीत भीषण स्फोट

  • शुक्रवारच्या नमाजावेळी पाकिस्तानमध्ये मशिदीत स्फोट

  • पाकिस्तान मशिद स्फोटात १५ जणांचा मृत्यू

  • खैबर पख्तुनख्वामधील कोहाट येथे मशिदीत स्फोट

  • नमाज पठण करताना मशिदीत शक्तिशाली स्फोट

पाकिस्तानमध्ये भीषण स्फोटाची घटना घडली. मशिदीमध्ये नमाज पठण करत असताना भयंकर स्फोट झाला. या स्फोटामध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील कोहाट येथे ही घटना घडली. जुन्या पोलिस लाइन्सजवळ मशिदीमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी हा शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटात १५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट शुक्रवारच्या नमाज पठणाच्या वेळी झाला. या स्फोटामुळे मशिदीबाहेर एक मोठा खड्डा पडला. मशिदीच्या भिंती कोसळून मोठे नुकसान झाले. स्फोटकांनी भरलेल्या एका वाहन ओल्ड पोलिस लाइन्समध्ये घुसवण्यात आले. या वाहनाने धडक दिल्याने स्फोट झाला. त्यानंतर सशस्त्र अतिरेक्यांनी गोळीबार केला. या स्फोटामुळे जवळच्या इमारतींचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला. अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. २५ जखमींना कोहाटच्या डीएचक्यू रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेनंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश होता. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिस आणि सुरक्षा दलांनी ओल्ड पोलिस लाइन्सला घेराव घातला असून शोध आणि तपासणी मोहीम सुरू होती. कोहाट-हांगू रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी हा स्फोट कसा झाला आणि या स्फोटामागे कुणाचा हात आहे याचा शोध घेत आहेत. स्फोटानंतर गोळीबार झाल्याचेही वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT