delhi news  Saam tv
देश विदेश

भारताच्या राजधानीत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश; 7 जणांच्या मुसक्या आवळल्या

delhi latest news : भारताच्या राजधानी दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणात ७ जणांना अटक करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश

पोलिसांनी ७ जणांना घेतलं ताब्यात

पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानप्रणित दहशतवाद्यांच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दहशतवादी नेटवर्कचा भंडाफोड करत सात जणांना ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानी शहाजाद भट्टी आणि त्याचा सहकारी अजमल गुज्जर हे दोघे भारतात नेटवर्क चालवत होते. पंजाबमार्गे पाकिस्तानहून बेकायदेशीर शस्त्रे , जिवंत काडतुसे, अंमलीपदार्थ हे दिल्लीत पुरवली जात होती.

पोलिसांनी कारवाईदरम्यान आरोपींकडून पाच पिस्तुल, ४१ जिवंत काडतुसे, सात मोबाईल, कार जप्त करण्यात आली आहे. विशेष पथकाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून भारतीय तरुणांना जाळ्यात अडकवत होते. भरपूर पैसे कमावण्याचं आमिष देऊन नेटवर्कचा भाग बनवत होते. त्यानंतर भारतीय तरुणांचा शस्त्रे आणि अंमलीपदार्थ पुरवण्याच्या कामात वापर केला जायचा.

खरंतर पोलिसांना आरोपींच्या नेटवर्कची माहिती मे २०२६ रोजी मिळाली. पोलिसांना शाहजाद भट्टी आणि अजमल गुज्जर दिल्ली-एनसीआरमध्ये दहशतवाती कारवाया करण्यासाठी कट रचत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासादरम्यान मोहित उर्फ योगी याला अटक केली. त्याच्याजवळ बेकायदेशीर शस्त्रे आढळले. तसेच त्याच्याजवळ पाकिस्तानी हँडलरचे मोबाइल नंबर देखील आढळले. त्यानंतर इतर आरोपी देखील जाळ्यात अडकले.

पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दिल्ली, गाझियाबाद आणि आसपासच्या अनेक ठिकाणांची रेकी केल्याची माहिती दिली. आरोपी फोटो आणि व्हिडिओ हे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना पाठवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानहून पाठवलेली शस्त्रे, अमलीपदार्थ पंजाबहून दिल्ली-एनसीआरमध्ये आणायचे काम करत होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, नेटवर्कशी संबंधित आरोपींच्या विरोधात आधीच हत्या, हत्येचा प्रयत्न आणि दरोडा, एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलीस या नेटवर्कशी संबंधित फरार आरोपींचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT