Special Report  Saam Tv
देश विदेश

Terrorist: पाकिस्तानचं दहशतवाद्यांना 14 कोटींचं इनाम, मेलेल्या दहशतवाद्याच्या नातेवाईकांना 1 कोटी

India Pakistan Tension : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या निर्ल्लज पाकिस्ताननं दहशतवाद्यांसाठी कोट्यवधीचा इनामाची योजनाच जाहीर केलीय.. मात्र ही योजना काय आहे? आणि पाक दहशतवाद्यांना कसा पोसतोय? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून..

Yash Shirke

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर दहशतवाद्यांच्या जनाजात पाक लष्कराचे अधिकारी उपस्थित राहिले आणि पाकचा बुरखा फाटला. मात्र पाकनं निर्लज्जपणाचा आणखी एक कळस गाठलाय. हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तान सरकार कोट्यवधी रुपयांचं इनाम देणार असल्याची माहिती पुढं आलीय.

दहशतवाद्यांना पाकिस्तानचं इनाम

पाक सरकारकडून शुहादा पॅकेजची घोषणा

भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना मदत

मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना देणार 1 कोटीचं बक्षीस

जखमी दहशतवाद्यांच्या कुटंबीयांना 20 लाखांची मदत

दहशतवादी मसूद अजहरला देणार 14 कोटी रुपये

हल्ल्यात नुकसान झालेल्या मदरशांच्या पुनर्बांधणीसाठीही आर्थिक मदत

पाकनं आतापर्यंत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र दुसरीकडं पाकनं दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करून दहशतवादी पोसत असल्याचे नवे पुरावे दिलेत. बहावलपूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी तर अधिकृतपणे निवेदन जारी करून पाकनं मदत जाहीर केली. त्यामुळे पाक केवळ जिवंतपणेच दहशतवाद्यांना पोसत नाही, तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुबीयांचीही काळजी घेतल्याचं यामुळे उघड झालंय. पाकिस्तान हाच आंतकीस्तान असल्याचं यामुळे पुन्हा एकदा जगासमोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुन्हा एकदा विजयाची झळाळी! RCB दुसऱ्यांदा WPL चॅम्पियन; चौथ्यांदा दिल्लीचं स्वप्न भंगलं, फायनल हातातून निसटलं

रामदास कदम हप्तेखोर, डान्सबारमधून पैसे कमावतात; ठाकरेंच्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, VIDEO

रेल्वे स्टेशनवर भीषण स्फोट; अनेक लोक जखमी; टॅम्बोव परिसर हादरला, VIDEO

PM मोदी-राहुल गांधी संसदेत भिडले? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात मुंबईहून नागपूरकडे वाहतूक खोळंबली

SCROLL FOR NEXT