Pune Crime
Pune CrimeX

Pune Crime : पतीचे विवाहबाह्य संबंध, पती-प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Pune Crime News : पती आणि त्याच्या प्रेयसीने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. महिलेचा पती आणि त्याच्या प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने पती आणि त्याच्या प्रेयसीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून पीडित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या पती आणि त्याच्या प्रेयसी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी विकास कोकणे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिने १० मे रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन स्वत:ला संपवले. पती विकास कोकणे आणि त्याची प्रेयसी अर्चना अहिरे यांच्या छळाला कंटाळून माधुरीने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Pune Crime
Pune News : राहत्या घरात दांपत्याची आत्महत्या, गळफास घेऊन जीवन संपवलं; कारण...

माधुरी आणि विकास यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर विकासचे अर्चना अहिरे हिच्याशी विवाहबाह्य संबंध सुरु झाले. ही गोष्ट समोर आल्यापासून माधुरी-विकास यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. प्रेयसी, अर्चनाच्या सांगण्यावरुन विकासने त्याच्या माधुरीला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला सुरुवात केली होती.

Pune Crime
हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉक्टर होती डेंटिस्ट, इंजिनिअर तरुणाच्या मृत्यूनंतर नवी माहिती समोर

पतीच्या जाचाला कंटाळलेल्या माधुरी कोकणेने १० मे रोजी आत्महत्या केली. त्यानंतर तिचा भावाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन विकास आणि अर्चना यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

Pune Crime
Kalyan News : खासगी शाळेतील संचालकाचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पालकांचा संताप, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com