pakistan x
देश विदेश

Pakistan : पेट्रोल २५८ रुपये, डिझेल २६२ रुपये प्रतिलिटर; युद्धाचा भडका, पाकिस्तान महागाईनं होरपळला!

Pakistan New : पाकिस्तान सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ जाहीर केली आहे. ३१ मे २०२५ रोजी पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा दरवाढ केल्याने पाकिस्तानमधील लोक वैतागले आहेत.

Yash Shirke

पाकिस्तानच्या सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. आजपासून (१६ जून) पुढील १५ दिवसांसाठी ही दरवाढ लागू राहणार आहे. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ४.८० रुपयांची, तर हाय स्पीड डिझेलच्या किमतीत प्रति लीटर ७.९५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

पाकिस्तान सरकारने केलेल्या नव्या दरवाढीनंतर, हाय स्पीड डिझेलची किंमत प्रति लीटर २६२.५९ रुपये झाली आहे. पेट्रोलची किंमत आता प्रति लीटर २५८.४३ रुपये प्रति लीटर अशी राहणार आहे. पेट्रोल उत्पादनांच्या सुधारित किमतींच्या संबंधित अधिकृत अधिसूचना पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने जाहीर केली आहे.

याआधी ३१ मे २०२५ रोजी पाकिस्तानच्या केंद्र सरकारने पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर एका रुपयांची वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोलची किंमत २५३.६३ रुपये प्रति लीटर किंमत निश्चित करण्यात आली होती. आता पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्य जनता आणि उद्योगांवर ताण येणार असल्याचे म्हटले जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम पाकिस्तानमधील वाहतूक, शेती आणि अन्य औद्योगिक क्षेत्रांवर होणार असल्याचे म्हटले जात आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे इतर वस्तू आणि सेवांच्या किंमती देखील वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक दबाव आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

South India Rice Dishes: साधा भात खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा 'हे' साऊथ इंडियन टेस्टी राईस डिशेस

Maharashtra Live News Update: महादेव मुंडेंच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

Nanded : लॉजमध्ये बहिणीला रंगेहात पकडलं, घाबरलेल्या तरुणीची लॉजवरुन उडी, भावाने तिच्या मित्राला भोसकलं; नांदेडमध्ये खळबळ

Chanakya Niti : रुसलेल्या बायकोला कोणत्या गोष्टी सांगू नयेत?

Pandharpur News: विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT