Pakistan Factory Blast social media
देश विदेश

Factory Blast : 'मृत्यूची फॅक्टरी'! बॉयलरच्या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू, पाकिस्तान हादरले

Pakistan Factory Blast : पाकिस्तानमध्ये शुक्रवारी एका कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात किमान १५ कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजते. या कारखान्यात गोंद निर्मिती केली जाते.

Nandkumar Joshi

  • गोंद तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट

  • बॉयलर स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू

  • पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील घटना

Lahor News : पाकिस्तानच्या पूर्व भागात एका कारखान्यात बॉयलर फुटला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूचा परिसर हादरला. या स्फोटात १५ कामगारांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. त्याचे हादरे आजूबाजूच्या परिसरातही बसले.

पाकिस्तानच्या पूर्वेकडील भागात हा कारखाना आहे. त्यातील बॉयलरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूचा परिसरही हादरून गेला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान १५ कामगार मृत्युमुखी पडले आहेत. तर अन्य काही कामगार जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेनंतर कारखान्यातील मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार स्फोटानंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहराजवळ हा कारखाना असून, त्यातील बॉयलरमध्ये स्फोट झाला. स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. स्थानिक प्रशासनानुसार, बॉयलरचा स्फोट इतका भीषण होता की कारखाना आणि आजूबाजूच्या घरांनाही हादरे बसले. त्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर या कारखान्यात आग लागली. या घटनेचा तपास सुरू असून नेमक्या कारणांचाही शोध घेतला जात आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री मरियम नवाझ शरीफ यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. या स्फोटात जखमी झालेल्या सर्व कामगारांना उपचार मिळतील हे सुनिश्चित करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने पाकिस्तानमधील औद्योगिक क्षेत्रातील दुर्घटना आणि कारखान्यांमधील आगीच्या घटना घडतात, असे एक कारण समोर आले आहे. २०२४ मध्ये फैसलाबादच्या कापड कारखान्यातही बॉयलर स्फोट होऊन डझनभर कामगार जखमी झाले होते. मागील आठवड्यातच पाकिस्तानच्या कराचीमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND A vs BAN A: नशिबानं दिलं पण कर्मानं गेलं! सुपर ओव्हरमध्ये भारत अ संघाचा लाजिरवाणा पराभव

Doctor Dance Video: दम दम दम मस्त है! सरकारी रुग्णालयात डॉक्टरचा बनियानवर महिलेसोबत डान्स; व्हिडिओ व्हायरल, मॅटर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं

Sakharpuda Benefits: लग्नाआधी साखरपुडा का करतात? कारण काय ?

Vaibhav Naik: सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय तोडफोड प्रकरणी ठाकरे गटाला दिलासा; माजी आमदार वैभव नाईकांची निर्दोष मुक्तता

Gavran Pithla Bhakri: गावरान पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल पिठलं, ज्वारीच्या भाकरीसोबत आखा जेवणाचा बेत

SCROLL FOR NEXT