Dubai Tejas Aircraft Crash: दुबई एअर शोमध्ये तेजस विमान कोसळले, अपघातामागे घातपाताचा संशय? VIDEO

Tejas Jet Crash in Dubai: दुबई एअर शो दरम्यान भारतीय लढाऊ विमान तेजस कोसळल्याने खळबळ उडाली आहे. कंट्रोल सिस्टीम जॅम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून घातपाताचाही संशय वर्तवला जात आहे.

दुबई एअर शो दरम्यान भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले आहे. या घटनेवर संरक्षण विश्लेषक कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) यांनी साम टीव्हीवर विश्लेषण केले. पटवर्धन यांच्या मते, 'एरोबेटिक्समधून बाहेर आलं आणि एकदम दगडासारखं खाली आलं...कदाचित त्यातही एंड वेरला कंट्रोल सिस्टीम जॅम झाली असेल.' ही एक अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले. तेजस हे साडेचार जनरेशनचे विमान असून त्याची तुलना चीनच्या विमानांशी होऊ शकते. या अपघाताचा 'आत्मनिर्भर भारत' आणि विमानांच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार नाही, कारण एअर शोमध्ये असे अपघात होत असतात, असेही पटवर्धन यांनी स्पष्ट केले. मलेशिया, फिलिपिन्स, इजिप्तसारखे देश तेजस खरेदी करण्यास इच्छुक होते. अपघाताचे नेमके कारण ब्लॅक बॉक्स आणि कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या अहवालानंतरच समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. प्रशासनाकडून नुकसानीबद्दल अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com