Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू
Bangaladesh Earthquakesaam tv

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

Bangaladesh Earthquake: बांगलादेशमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के बसले. यामुळे घरं कोसळली. यामध्ये ६ जणांचा मृत्यू आणि ५० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published on

Summary -

  • बांगलादेशमध्ये ५.६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप

  • बांगलादेशमध्ये भूकंपामुळे जणांचा मृत्यू तर ५० जण जखमी

  • भूकंपाचे हादरे भारतातील कोलकातापर्यंत बसले

  • भूकंपामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळून मोठं नुकसान

भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादला. शुक्रवारी सकाळी बांगलादेशमध्ये ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचे हादरे भारतातील कोलकातापर्यंत बसले. भूकंपाचे हादरे बसल्यामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळून मोठे नुकसान झाले. या भूकंपामुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बांगलादेशमध्ये भूकंपाचे धक्के बसण्यापूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले.

मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू बांगलादेशच्या टुंगीपासून २७ किमी दूर पूर्वेला होता. याची खोली १० किलोमीटर असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिक प्रचंड घाबरले आणि ते घराबाहेर पडले. पश्चिम बंगालच्या कोलकातापर्यंत हे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते. हे भूकंपाचे धक्के सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जाणवले.

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू
Earthquake News: आसाम हादरलं! ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने गुवाहाटीमध्ये धावपळ

या भूकंपाचे धक्के कोलकातासोबतच आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर बंगालमध्ये जाणवले. कुचबिहार, दिनाजपूरमध्ये देखील भूकंपाचे हादरे बसले. पश्चिम बंगालमध्ये या भूकंपाच्या धक्क्यामुळे काहीच नुकसान झाले नाही. पण भूकंपाचे हादरे बसतानाचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये घरामधील पंखे, झुंबर हालताना दिसत आहे. एका कॉलेजमधील विद्यार्थी भूकंपाचे धक्के जाणवल्यानतंर वर्गाच्या बाहेर पळताना दिसले. तर काही व्हिडीओमध्ये नागरिक रस्त्यावरून पळत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करताना दिसले.

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू
Earthquake : अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं! अनेकांची घरे उध्वस्त, २० जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

दरम्यान, आज पहाटे पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे ३ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ५.२ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्र पाकिस्तानमध्ये सुमारे १३५ किलोमीटर खोलवर होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, गुरुवार-शुक्रवार रात्री हिंदी महासागरातही ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले.

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू
Earthquake : इमारती कोसळल्या, लाईट गेली; जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ; भूकंपामुळे ६.१ रिश्टर स्केलचे हादरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com