Pakistan struggles with rising debt as it seeks financial support from Gulf nations to repay UAE loan. saam tv
देश विदेश

पाकिस्ताननं फिरवला भिकेचा कटोरा, बुडत्या पाकला उधारीचा आधार

Pakistan Seeks Loans To Repay Uae Debt Crisis: आखातातील युद्धात मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला कर्जाच्या कुबड्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये. युएईचं कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाकिस्ताननं उधारीचा नवा मार्ग शोधलाय. पाहूयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट...

Saam Tv

कंगाल पाकिस्तान संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईचं कर्ज फेडण्यासाठी पुन्हा एकदा जगासमोर भिकेचा कटोरा फिरवलाय. तब्बल 3.5 अब्ज डॉलर्सचं कर्ज फेडण्यासाठी कंगाल पाकिस्तानचे नाकीनाऊ आलेत. युएईचं कर्ज फेडण्यासाठी आता पाकिस्ताननं सौदी अरेबिया आणि कतार या देशांसमोर हात पसरलेत. यासाठी पाकिस्तानी सरकारनं कशा हालचाली सुरू केल्यात पाहूयात...

कंगाल पाकिस्तानला एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत युएईला कर्ज परतफेड करायचीय. या पार्श्वभूमिवर सौदीचे अर्थमंत्री मोहम्मद बिन अब्दुल्ला अल-जदान यांच्या उपस्थितीत इस्लामाबादमध्ये एक बैठक झाली. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, परराष्ट्र मंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर उपस्थित होते. कतार आणि सौदी अरेबिया कर्जाची रक्कम 'स्टेट बँक ऑफ पाकिस्तान'मध्ये जमा करणार आहेत.

पाकिस्तानी सरकार हे 5 अब्ज डॉलर्स खर्च करू शकत नाही. मात्र, हेच कर्ज कंगाल पाकिस्तानला कसं तारणार आहे पाहूयात...आयात खर्च वाढत असल्याने पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्यावर सतत दबाव आहे. अधिकाऱ्यांच्या मते, जर नवीन आर्थिक मदत मिळाली नाही, तर येत्या काही आठवड्यांत हा साठा आणखी कमी होऊ शकतो. सूत्रांनुसार, सौदी अरेबिया आणि कतारकडून मिळणारं 5 अब्ज डॉलर्सचं कर्ज पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. सध्या पाकिस्तानचा परकीय चलन साठा सुमारे 16.4 अब्ज डॉलर्स आहे. त्यामुळे हे कर्ज पाकिस्तानला आपले कर्ज फेडण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

एव्हंढच नाही तर परकीय गंगाजळीवरील वाढता भार कमी करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेलाही साकडं घालणार आहे. काल युएई आणि आज सौदी-कतार... शेवटी काय 'उधारीवरचं जगणं' फार काळ टिकत नसतं. दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर 'भिकेचा कटोरा' फिरवण्याची वेळ आलीये... एव्हंढ मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT