Pakistan Bomb Blast Saam Tv
देश विदेश

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये पोलिस ठाण्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसवत हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले.

Priya More
  • पाकिस्तानच्या आत्मघाती हल्ला

  • डेरा इस्माईल खानमध्ये पोलिस चौकीवर आत्मघाती हल्ला

  • स्फोटात १३ जणांचा मृत्यू तर ३५ जण जखमी

  • पोलिस चौकीवर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवले

पाकिस्तान आत्मघाती हल्ल्याने हादरला. शनिवारी वायव्य पाकिस्तानमध्ये रस्त्यावरील पोलीस चौकीवर आत्मघाती बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला तर ३५ जण जखमी झाले. या घटनेमुळे पोलीस ठाण्यासह आसपासच्या परिरातील वाहनांचे मोठे नुकसान झाले. या स्फोटानंतर बचावकार्य आणि मदतकार्य करण्यात आले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटाचा तपास सध्या सुरू आहे.

प्रांतीय आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी सांगितले की, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करण्यात आला होता. स्थानिक पोलीस प्रमुख सफदर बलोच यांनी सांगितले की, मृत आणि जखमींपैकी बहुतेक जण पोलीस कर्मचारी आणि वाटसरू होते. या स्फोटामुळे एक प्रमुख पोलीस चौकी उद्ध्वस्त झाली आणि प्रत्यक्षदर्शींनी हल्ल्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे.

या हल्ल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा दलाने धाव घेत पत्कालीन पथके पीडितांना जवळच्या रुग्णालयात नेत असताना, बंदूकधाऱ्यांनी रुग्णवाहिकेवर गोळीबार केला. ज्यात एक बचाव कर्मचारी ठार झाला आणि इतर दोघे जखमी झाले. या आत्मघाती हल्ल्यानंतर मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. पाकिस्तानी तालिबान, ज्याला अधिकृतपणे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा टीटीपी म्हणून ओळखले जाते त्याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्ज आणि मुलीच्या उपचाराच्या चिंतेने शेतकऱ्याने संपवलं जीवन

Diva Travel : 'दिव्या'जवळील ७ विरंगुळ्याची ठिकाणे, शहराच्या गोंगाटापासून दूर प्लान करा वन डे ट्रिप

Vastu Shastra : तुमच्या किचनचा ओटा कोणत्या रंगाचा? वास्तू शास्त्रानुसार 'हे' रंग आहेत शुभ

Rain Update : विजांसह मुसळधार पाऊस, कोकणासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, वाचा हवामानाचा अंदाज

BJP MLA Accident: भाजप आमदाराच्या कारला भीषण अपघात, गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेलं; अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO

SCROLL FOR NEXT