पोलीस कॉन्स्टेबल 3 दिवसांपासून बेपत्ता, नंतर बस डेपोत मृतदेह; घटनेने खळबळ

Pimpri-Chinchwad Police Constable Dies In Tragic Incident: पिंपरी चिंचवड पोलीस दलातील कॉन्स्टेबल विजय कोळी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील पीएमपीएल बस डेपोमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. घटनेचा निगडी पोलीस तपास करत आहेत.
POLICE CONSTABLE VIJAY KOLI FOUND DEAD IN PIMPRI CHINCHWAD | PIMPRI CHINCHWAD NEWS
POLICE CONSTABLE VIJAY KOLI FOUND DEAD IN PIMPRI CHINCHWAD | PIMPRI CHINCHWAD NEWSsaam tv
Published On: 

गोपाल मोटघरे, साम टीव्ही

पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील पीएमपीएल बस डेपोमध्ये आढळला आहे. विजय कोळी असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

POLICE CONSTABLE VIJAY KOLI FOUND DEAD IN PIMPRI CHINCHWAD | PIMPRI CHINCHWAD NEWS
RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

विजय कोळी मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा शोध घेतला जात असतानाच, आज सकाळी त्यांचा मृतदेह बस डेपोच्या आवारात संशयास्पद स्थितीत आढळून आला. प्राथमिक तपासात त्यांनी स्वतःच्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

POLICE CONSTABLE VIJAY KOLI FOUND DEAD IN PIMPRI CHINCHWAD | PIMPRI CHINCHWAD NEWS
RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सखोल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com