RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

Bhopal RTO Inspector Meenakshi Gokhale Killed Case: भोपाळमध्ये 36 वर्षीय RTO निरीक्षक मीनाक्षी गोखले यांची हातोड्याने वार करून हत्या करण्यात आली. घटनेनंतर परिचित पवन कुमार द्विवेदी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
BHOPAL RTO INSPECTOR MEENAKSHI GOKHALE
BHOPAL RTO INSPECTOR MEENAKSHI GOKHALEsaam tv
Published On

भोपाळ: दातिया येथे कार्यरत असलेल्या 36 वर्षीय महिला RTO निरीक्षकाची हातोड्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भोपाळमधील खजुरी येथील लेक पर्ल कॉलनीतील एका घरात सोमवारी पहाटे ही घटना घडली. दरम्यान, महिलेचा परिचित असलेला व्यक्ती घरापासून अवघ्या 20 ते 50 मीटर अंतरावर झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानेच महिलेची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

BHOPAL RTO INSPECTOR MEENAKSHI GOKHALE
भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात खळबळ

खजुरी पोलिसांनी मृत महिलेची ओळख मीनाक्षी गोखले अशी पटली असून, त्या इंदूरच्या रहिवासी होत्या. तर मृत व्यक्तीचे नाव पवन कुमार द्विवेदी असून तो मूळचा सिधी जिल्ह्यातील रहिवासी होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीनाक्षी रविवारी सायंकाळी तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह आणि एका महिला मैत्रिणीसोबत पवनच्या घरी गेल्या होत्या. रात्री जेवण झाल्यानंतर मैत्रीण आणि मुलगी घरातील आतील खोलीत झोपण्यासाठी गेले. सोमवारी सकाळी मैत्रीण बाहेर आली असता तिला मीनाक्षी मृतावस्थेत आढळून आल्या. तिने आरडाओरड केल्यानंतर शेजारी घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांना माहिती देण्यात आली.

BHOPAL RTO INSPECTOR MEENAKSHI GOKHALE
Shocking : बाप नाही हैवान! घरात कोणीही नसल्याची संधी साधून पोटच्या मुलीवर अत्याचार ; जळगावमधील धक्कादायक घटना

पोलिसांना मीनाक्षी यांच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या. घटनास्थळी रक्ताने माखलेला हातोडाही सापडला. प्राथमिक तपासानुसार, रात्री घराच्या पोर्चमध्ये मीनाक्षींवर हातोड्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घरातील एका खोलीत ओढून नेण्यात आल्याचा संशय आहे. दरम्यान, पवन घरातून गायब असल्याचे आढळून आले. शेजाऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता घरापासून सुमारे 20 ते 50 मीटर अंतरावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मात्र, पवनच्या खिशात बँकेचे पासबुक आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

BHOPAL RTO INSPECTOR MEENAKSHI GOKHALE
Shocking : धक्कादायक! बायकोने नवऱ्याच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या, प्रायव्हेट पार्टवर विजेचा शॉक दिला अन्...

दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पवनने मीनाक्षी यांची हत्या करून त्यानंतर स्वतः गळफास घेतला का, याचाही तपास केला जात आहे. हत्येमागील नेमका हेतू तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मीनाक्षी आणि पवन एकमेकांना इंदूरपासून ओळखत होते. मीनाक्षी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना पवन कोचिंग क्लासेस चालवत होता. त्यानंतर मीनाक्षी RTO विभागात रुजू झाल्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्या आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत होत्या.

BHOPAL RTO INSPECTOR MEENAKSHI GOKHALE
IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

प्राथमिक तपासात पवनला मीनाक्षी यांच्याशी लग्न करायचे होते, मात्र त्यांच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध असल्याचे समोर आले आहे. रविवारी मीनाक्षी आपले काही सामान घेण्यासाठी पवनच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हत्या आणि त्यानंतर झालेल्या आत्महत्येच्या संशयित घटनाक्रमाचा सविस्तर तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com