PAKISTAN COAL MINE EXPLOSION: 30 WORKERS KILLED IN BALOCHISTAN METHANE BLAST, RESCUE OPERATION CONTINUES Saam Tv
देश विदेश

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Coal Mine Explosion : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील क्वेटाजवळील कोळसा खाणीत मिथेन वायूच्या भीषण स्फोटात ३० कामगारांचा मृत्यू झाला. अनेक कामगार अद्याप अडकल्याची भीती असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बलुचिस्तानमधील क्वेटाजवळील कोळसा खाणीत मिथेन वायूचा भीषण स्फोट

  • या दुर्घटनेत ३० खाण कामगारांचा मृत्यू

  • बचाव पथके सुमारे ४,००० फूट खोलीवर शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर करत आहेत

  • या घटनेमुळे पाकिस्तानमधील खाण सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रांताची राजधानी क्वेटाच्या बाहेरील कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात ३० खाण कामगारांचा मृत्यू झाला असून, १० जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही दुर्घटना गुरुवारी घडली असून, घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बलुचिस्तानचे खाण आणि खनिज विकास मंत्री शोएब नोशेरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा खाणीच्या कोसळलेल्या भागात एकूण ३६ कामगार काम करत होते. सरकारी खाण निरीक्षक घनी बलोच यांनी सांगितले की, खाणीत मोठ्या प्रमाणात साचलेल्या मिथेन वायूमुळे हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, जवळपास असलेल्या दोन खाणींनाही त्याचा फटका बसला.

स्फोटानंतर काही तासांत सात कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेत आणखी २३ मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांची संख्या ३० वर पोहोचली आहे. उर्वरित कामगारांचा शोध अद्याप सुरू असून, बचाव पथके सुमारे ४,००० फूट खोलीवर पोहोचून शोधकार्य करत आहेत.

प्रांतातील खाणींचे मुख्य निरीक्षक मुहम्मद आतिफ यांनी सांगितले की, मिथेन वायूच्या स्फोटानंतर खाणीतील ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी होते. त्यामुळे अडकलेल्या कामगारांना जिवंत बाहेर काढण्याची शक्यता कमी असली तरी बचावकार्य थांबवलेले नाही. "आम्हाला काही कामगार जिवंत सापडतील अशी आशा आहे, मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर आहे," असे त्यांनी सांगितले. या भीषण दुर्घटनेनंतर खाण सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात रात्री साडे अकराच्या सुमारास कॅम्प परिसरात अपघात

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

SCROLL FOR NEXT