Pahalgam attack Saam TV
देश विदेश

Pahalgam हल्ल्यातील सर्व दहशतवादी ठार? पर्यटकांवर हल्ला करणाऱ्यांचा बदला? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Fact Check : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय...व्हिडिओत जवान दहशतवाद्यांना मारताना दिसताय...मात्र, हा व्हिडिओ पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मारतानाचा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

पहलगाममध्ये ज्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, त्याच दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा करण्यात आलाय...व्हायरल व्हिडिओत भारतीय सैनिकांनी सर्च ऑपरेशन करून दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केलाय...त्यामुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...हे दहशतवादी कोण होते...? पाकिस्तानातून आले होते की भारतातलेच होते...? कारण, 26 बहिणींच्या हत्येचा बदला घेणारे कोण होते....? हे कळणं गरजेचं आहे...

या व्हिडिओत दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सैनिक त्यांचे मृतदेह नेत असल्याचं दिसतंय...पण, खरंच पहलमाग हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा हा व्हिडिओ आहे का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

पहलगाम हत्याकांडातील चारही दहशतवाद्यांना भारतीय सेनेने थोड्याच वेळापूर्वी यमसदनास पाठविले.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...कारण, पहलगाम हल्ल्यात जे दहशतवादी होते त्यांचा सैनिक शोध घेत होते...अख्खा परिसर, जंगल पिंजून काढला...मात्र, काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सैनिकांना यश आलं...पण, पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार केलंय का...? आसिफ फौजी, सुलेमान शाह, अबू तल्हा अशी दहशतवाद्यांची नावं आहे...त्यांचे फोटोही समोर आलेयत...त्यांचा सध्या जवान शोध घेत असून, ते सापडलेले नाहीत...त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

- पहलगाम हल्ल्यातील एकही दहशतवादी ठार झालेला नाही

- हल्ल्यातील दहशतवाद्यांचा सैनिक शोध घेतायत

- कारवाई करतानाचा जवानांचा व्हिडिओ जुना

- जुना व्हिडिओ व्हायरल करून चुकीचा दावा

...त्यामुळे आमच्या पडताळणीत पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करताना जवानांचा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य ठरलाय...काही लोक चुकीचा मेसेज व्हायरल करून असे व्हिडिओ व्हायरल करतायत...त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT