Pahalgam Terror Attack 
देश विदेश

Pahalgam Attack: पहलगाम हल्ला घडवणारा सैनिक कोण? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Pahalgam Attack: पहलगामचा हल्ला हा भारतानेच घडवून आणल्याचा दावा एका सैनिकाने केलाय. या सैनिकाचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय.

Sandeep Chavan

पहलगामचा हल्ला हा भारतानेच घडवून आणल्याचा दावा एका सैनिकाने केलाय. या सैनिकाचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय. पण खरंच हा हल्ला पूर्वनियोजित होता का? या सैनिकाच्या दाव्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

हा व्हिडिओ पाहिलात, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय त्या व्हिडिओत दावा करण्यात आलाय की पहलगाम हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि हा हल्ला भारतानेच घडवलाय. या दाव्यामुळे खळबळ उडालीय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का? व्हायरल व्हिडिओतील व्यक्ती भारतीय सैनिक आहे का? याची सत्यता जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.अशोक कुमारच्या नावाने हा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे अशोक कुमार नावाची व्यक्ती सैन्यदलात आहे का? त्याने हा व्हिडिओ बनवलाय का? याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्यावेळी आम्हाला व्हिडिओसोबत काही फोटोही सापडले. त्यावरून शोध घेतला असता ही व्यक्ती कोण आहे हे सगळं समोर आलं.

व्हायरल सत्य/ साम इन्व्हिस्टिगेशन

पहलगाम हल्ल्याबाबत बोलणारी व्यक्ती भारतीय सैनिक नाही

मलिक कांजी असं या व्यक्तीचं नाव असून तो पाकिस्तानी

मलिक कांजी हा पाकिस्तान सुरक्षा समितीचा सदस्य

कांजीने घातलेला भारतीय सैनिकांचा ड्रेस जुना आहे

व्हिडिओ व्हायरल करून भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

व्हायरल केलेल्या व्हिडिओ व्यक्ती भारतीय सैनिक नसल्याचं स्पष्ट झालं...त्याने घातलेला ड्रेसही 2022 सालीच बदलण्यात आलाय.त्यामुळे पहलगाम हल्ला हा पूर्वनियोजित होता आणि हल्ला भारतानेच घडवल्याचा दावा असत्य ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT