Security Forces Demolish Homes of 10 Terrorists in Kashmir Saam Tv
देश विदेश

Pahalgam Attack: दहशतवाद्यांची आता खैर नाही! सुरक्षा दल अ‍ॅक्शन मोडमध्ये, १० दहशतवाद्यांची घरं बॉम्बने उडवली| VIDEO

Security Forces Demolish Homes of 10 Terrorists in Kashmir:

Priya More

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ निष्पाप पर्यटकांचा जीव गेला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. आतापर्यंत काश्मीरमध्ये ९ दहशतवाद्यांची घरे बॉम्बने आणि बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आली. शनिवारी रात्री लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी जमील अहमद याचे घर सुरक्षा दलांनी बॉम्बने उडवून दिले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत जवानांकडून एका एका दहशतवाद्याविरोधात कारवाई केली जात आहे. शनिवारी रात्री सुरक्षा दलाने जमील अहमद याचे घर उडवून दिले. याच्या एक दिवस आधी काश्मीरमध्ये दोन सक्रिय लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्यांची घरे उडवून देण्यात आली. यापैकी एक घर शोपियान जिल्ह्यातील अदनान शफीचे होते. तर दुसरे घर फारुख अहमदचे होते. दोघांची घरं जमीनदोस्त करण्यात आली. हे दोघे दहशतवादी सध्या पाकिस्तानमधून त्याच्या दहशतवादी कारवाया चालवत आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या तीन दिवसांत जिल्हा अधिकाऱ्यांसह सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात अनेक दहशतवाद्यांविरोधात कारवाई केल्या. काही दशतवाद्यांना ठार करण्यात आले. या दहशतवाद्यांच्या मालमत्ता उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत आणि त्यांना आयईडीने उडवून देण्यात आले आहे. शोपियानच्या छोटीपोरा गावात लष्कर कमांडर शाहिद अहमद कुट्टेचे घर सुरक्षा दलाने कारवाई करत जमीनदोस्त केले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुट्टे गेल्या ३-४ वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी होता.

बांदीपोरा जिल्ह्यातील नाझ कॉलनीतील जमील अहमद आणि जैनापोरा येथील अदनान शफी यांच्याव्यतिरिक्त, सुरक्षा दलांनी ज्या दहशतवाद्यांची घरे पाडली त्यात फारूक, अनंतनाग जिल्ह्यातील ठोकरपोरा येथील आदिल अहमद ठोकर, पुलवामा येथील मुरान येथील अहसान उल हक शेख, त्राल येथील आसिफ अहमद शेख, शोपियानमधील छोटीपोरा येथील शाहिद अहमद कुट्टे, त्रालमधील खासीपोरा येथील अमीर नजीर आणि कुलगाममधील मतलहमा येथील जाहिद अहमद घनी यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT