Ram Sutar passed away Saam TV Marathi
देश विदेश

Ram Sutar : शिल्पकलेतील भीष्माचार्य काळाच्या काळाच्या पडद्याआड, राम सुतार यांचं निधन

Ram Sutar passed away Update : स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Veteran sculptor Ram Sutar passed away : जगातील सर्वात उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे डिझायनर आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. १०१ व्या वर्षी त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी शिल्पकलेच्या प्रांतातील चालता बोलता इतिहास अशी जगभरात ओळख निर्माण केली होती. शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि अंतिम विधी आज सकाळी ११ वाजता होणार आहेत. अंत्ययात्रा ए२ सेक्टर 19, नोएडा येथून सुरू होऊन अंतिम निवास, सेक्टर 94, सुपरनोव्हा इमारतीजवळ निघेल, अशी माहिती त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी दिली.

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात त्यांचा जन्म झाला. राम सुतार यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले आणि देशभरातील अनेक स्मारकांसाठी शिल्पकला दिली. त्यांच्या निधनाने भारतीय कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राम सुतार यांनी आपल्या ७ दशकांच्या कारकिर्दीत हजारो शिल्पकृती साकारल्या. त्यांच्या सर्वात मोठ्या योगदानांपैकी एक म्हणजे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी – सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा होय. त्याशिवाय त्यांनी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी महापुरुषांच्या शेकडो पुतळ्यांची निर्मिती केली.

२०२४ मध्ये प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. राम सुतार यांनी आयुष्यभर २०० हून अधिक भव्य शिल्पे घडवली. यात स्टॅच्यू ऑफ युनिटी, संसदेसमोरील गांधीजींचा पुतळा, सरदार पटेल, नेहरू, आंबेडकर, शिवाजी महाराज, फुले यांचे पुतळे आणि जगभरातील अनेक गांधी पुतळे यांचा समावेश आहे. कांस्य आणि दगडी शिल्पांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यांना १९९९ मध्ये पद्मश्री आणि २०१६ मध्ये पद्मभूषण मिळाले.सरकारी नोकरी सोडून त्यांनी स्वतंत्र शिल्पकला क्षेत्रात नाव कमावले. त्यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनीही वडिलांसोबत काम करत नोएडाजवळ ‘आनंदवन’ नावाचे भव्य शिल्प उद्यान उभारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT