Bengaluru Opposition meeting saam tv
देश विदेश

Opposition Meeting: सोनिया गांधी यांची उद्या डिनर डिप्लोमसी; 23 विरोधी पक्ष उपस्थित राहणार, लोकसभेचा फॉर्मुला ठरणार?

Bengaluru Opposition meeting: बिहारच्या पाटणा येथे यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक पार पडली होती.

Chandrakant Jagtap

Opposition’s Bengaluru Meeting: सोनिया गांधी यांनी सोमवारी 17 जुलैला सर्व विरोधकांची बंगळुरू येथे बैठक बोलवली आहे. या बैठीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

बिहारच्या पाटणा येथे यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक पार पडली होती. त्यानतंर आता सोनिया गांधी यांनी विरोधकांना बंगळुरू येथे रात्र भोजनासाठी निमंत्रण दिले आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीसाठी आणि भोजनासाठी आमंत्रण दिले असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. पाटण्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीला 18 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.

यावेळी 23 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसह देशातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. (Latest Political News)

संजय राऊत यांनी सांगितले की, या बैठकीसाठी हुकूमशाहीच्या विरोधात जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्यास इच्छुक आहेत असे किमान 22 ते 23 पक्ष एकत्र येतील आणि 2024 च्या निवडणुकांसंदर्भात आपल्या भूमिका तिथे मांडतील. (Tajya Marathi Batmya)

या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे देखील उपस्थित असतील. तसेच देशभरातून सर्व प्रमुख लोक या बैठकीसाठी उपस्थित राहतील. सोनिया गांधी यांनी 17 तारखेला सर्वांसाठी डिनरचे आयोजन केले आहे आणि ही बैठक देखील सांयकाळीच होणार आहे असेही राऊत यांनी सांगितले. (Latest Marathi News)

'आप'ची भूमिका अजून तळ्यात मळ्यात

आम आदमी पार्टीच्ये (AAP) च्या राजकीय व्यवहार समितीची (PAC) आज दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीवर चर्चा होणार आहे. 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या बैठकीनंतरच बंगळुरूच्या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत माहिती देऊ शकू असे पत्रकारांना सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील पीएसीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

Marathi bhasha Vijay Live Updates : उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT