Nitin Gadkari News: सरकारची सावली ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो; नितीन गडकरींचं धक्कादायक विधान

Nitin Gadkari Nagpur Speech: सरकारमधील अडचणी ज्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. आता मांडलेल्या अनेक गोष्टी कटू सत्य आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.
Nitin Gadkari
Nitin Gadkari saam tv
Published On

Nitin Gadkari Latest News: सरकारची सावली ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो, असं धक्कादायक विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सी. डी. माई पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतिने आयोजित सी. डी. माई पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, गॉड आणि गव्हर्नमेंट या दोघांवर आपला विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची सावली देखील ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो, या थिअरीवर माझा विश्वास आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. त्यामुळे सरकारपासून जो दूर राहील तोच प्रगती करू शकतो असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. सरकारमधील अडचणी ज्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. आता मांडलेल्या अनेक गोष्टी कटू सत्य आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari
Maharashtra Cow Milk Price: राज्यातील दूध उत्पादकांना मोठा दिलासा, सरकारकडून गायीच्या दूधाचे दर निश्चित; 21 जुलैपासून होणार लागू

गडकरी म्हणाले, एक गोष्ट खरी आहे की आपल्या देशाच्या टोटल जीडीपी ग्रोथमध्ये शेतकरी, शेती आणि आपल्याकडे असलेल्या शेतीच्या इतर उत्पन्नाच्या स्त्रोतांचे कॉन्ट्रीब्युशन 12 टक्के आहे. मनुफॅक्चरिंग सेक्टर 22 ते 24 टक्के आहे आणि सर्विस सेक्टरचं 52 ते 54 टक्के आहे. (Tajya Marathi Batmya)

शरद जोशी यांच्या विचारांचा मी समर्थक आहे आणि त्यांनी केलेल्या मुल्यांकनाची प्रशंसा करणारा एक कार्यकर्ता देखील आहे. आज आपल्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की आपल्याला देशाच्या कृषी क्षेत्राचं उत्पन्न 22 टक्‍क्‍यांपर्यंत न्यायचे आहे. ज्या दिवशी आपण हे 22 टक्क्यांपर्यंत नेऊ, त्या दिवशी शेतकऱ्यांची मजूरी 1500 शे रुपये होईल. (Latest Political News)

Nitin Gadkari
Maharashtra Politics: विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार? महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक

गडकरी म्हणाले, अनेक गोष्टी कटु सत्य आहेत, या वर्षी यावर्षी एमएसपी जी दिली, त्यामध्ये अडचण अशी आहे की, मार्केट प्राईझ कमी आहे आणि एमएसपी जास्त आहे. त्याचा बॅलन्स करण्याकरता सरकारला दीड लाख दीड लाख दीड द्यावे लागले आणि जे घेतलेलं अन्न आहे ते ठेवायला, स्टोरेज करायला गोडाऊन बरोबर नाहीत. त्यातून किती सडलं आणि काय झालं ते परमेश्वराला माहित. मी त्यावर जास्त बोलत नाही, मंत्री असल्यामुळे मला बोलण्याच्या काही मर्यादा आहेत. परंतु येणाऱ्या काळात आपण क्रॉप पॅटर्न ठरवला पाहिजे. शरद जोशींनी त्याचं सुंदर अनालिसिस केलं आहे, असेही गडकरी म्हणाले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com