Operation Sindoor Saam Tv News
देश विदेश

ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची ६ विमानं पाडली, रशियाचं विमान गेमचेंजर ठरलं; हवाई दलाकडून माहिती

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाच पाकिस्तानी विमाने पाडली. ३०० किमी अंतरावरून केलेल्या हल्ल्याचा विक्रम. S400 क्षेपणास्त्राला गेमचेंजर मानलं गेलं.

Bhagyashree Kamble

  • ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाच पाकिस्तानी विमाने पाडली.

  • ३०० किमी अंतरावरून केलेल्या हल्ल्याचा विक्रम.

  • S400 क्षेपणास्त्राला गेमचेंजर मानलं गेलं.

  • पाकिस्तानने मोठं नुकसान टाळण्यासाठी युद्धबंदी मागितली.

बंगळुरू येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय हवाई दलाचे प्रमुख, मार्शल अमरप्रीत सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्याचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, या कारवाईत पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक मोठं एअरक्राफ्ट पाडण्यात आलं. भारतीय हवाई संरक्षण प्रणाली S400 चे कौतुक करताना त्यांनी ते गेमचेंजर म्हटले आहे.

बंगळूरू येथील एका कार्यक्रमादरम्यान, भारतीय हवाई दल प्रमुख म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आम्ही पाकिस्तानचे खूप नुकसान केलंय. आम्ही त्यांची ५ विमानं ३०० किलोमीटर अंतरावरून पाडली, जे जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी विक्रमी कामगिरी आहे', असं ते म्हणाले.

रशियाकडून नुकतंच खरेदी केलेल्या S400 चेही प्रमुखांनी कौतुक केले आहे. 'आमच्या हवाई सरंक्षण यंत्रणेने खूप चांगले काम केले आहे. आम्ही अलिकडेच S400 खरेदी केले आहे. हे क्षेपणास्त्र आमच्यासाठी गेमचेंजर ठरले आहे. याची रेंज इतकी जास्त होती की, कोणतेही पाकिस्तानी विमान किंवा बॉम्ब आमचं काहीही वाकडं करू शकलेलं नाही. किंवा कदाचित आमच्या जवळही येऊ शकले नसते. आमचे हवाई सरंक्षण खूप मजबूत आहे', असंही प्रमुख म्हणाले.

पाकिस्तान युद्धबंदीसाठी पुढे आला

हवाई दल प्रमुख म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे एक हायटेक युद्ध होते. पहिल्या ८० ते ९० तासांत आम्ही पाकिस्तानचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यांच्या बहुतांश तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानी लोकांना समजले होते की, जर हे युद्ध असेच सुरू राहिले तर, त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणूनच त्यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानी डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन केला. नंतर हे युद्धबंदी झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Koli: युट्यूब स्टार 'मोस्टलीसेन'चा नवा लूक पाहिलात का? चाहत्यांना लवकरच देणार नवं सरप्राईज

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये दोन ST बसेसची समोरासमोर धडक

Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी भडकले

Travel Insurance: रेल्वे प्रवाशांनो लक्ष असू द्या! फक्त ४५ पैशांत मिळवा १० लाखांचा प्रवास विमा, कसा ते वाचा सविस्तर...

Leopard Attack : बाजारातून परत जाताना बिबट्याचा हल्ला; वृद्ध महिला गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT