भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला केला.
मसूद अजहरचं संपूर्ण कुटुंब ठार झालं.
जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरनं हल्ल्याची कबुली दिली.
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून कारवाई करण्यात आली.
ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यात दहशतवादी मसूद अजहरचं कुटुंब मारल्याच्या वृत्त अनेक महिन्यानंतर समोर आलंय. भारतीय लष्करी कारवाईच्या काही महिन्यांनंतर जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी याने कबूल केले की, बहावलपूरमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी गटाचा टॉप कमांडर मसूद अझहरच्या कुटुंबातील व्यक्तींचा मृ्त्यू झाला होता.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, जैशचा कमांडर मसूद इलियास काश्मिरी भारतीय सशस्त्र दलांनी त्यांच्या लपण्याच्या ठिकाणी घुसून त्यांच्यावर हल्ला कसा केला हे सांगितलं. व्हिडिओमध्ये इलियास काश्मिरी म्हणतो की, ७ मे रोजी जेव्हा भारताने बहावलपूरमधील दहशतवादी तळावर हल्ला केला तेव्हा दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले.
तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये मसूद इलियास कश्मीरी म्हणाला की, दहशतवादाला अवलंब करत आपण या देशाच्या संरक्षणासाठी दिल्ली, काबूल, आणि कंधारमध्ये लढाई केली. सर्व काही बलिदान केल्यानंतर ७ मेला भारतीय लष्कराने मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबियांचा खून केला.
काश्मिरी हा एका सभेत बोलत होता. सभेच्या स्टेजवर काही शस्त्रधारी सुरक्षा रक्षक आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी २६ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांना निर्घृणपणे ठार मारले. या घटनेच्या काही आठवड्यांनंतर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि आयसिस या दहशतवादी संघटनांना लक्ष्य करून 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले.
या ऑपरेशनमध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या लपण्याच्या ठिकाणावर हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराच्या हल्ल्यांमध्ये बहावलपूर, कोटली आणि मुरीदके येथील दहशतवाद्याचे लपण्याच्या ९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. ही सर्व दहशतवाद्यांची केंद्रे असल्याचं पाकिस्तानानं अनेक महिने झाल्यानंतर कबूल केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.