Terrorist Attack : लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला; १२ जवानांचा मृत्यू, पाकिस्तानात खळबळ

Terrorist Attack News : पाकिस्तानच्या लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १२ जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
Pakistan News
Pakistan Terrorist Attack NewsSaam tv
Published On
Summary

दक्षिण वझिरिस्तानमध्ये घातपाती दहशतवादी हल्ला

पाकिस्तानी तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आणि शोधमोहीम सुरू

अफगाणिस्तान सीमाभागातून हल्ल्यांमध्ये वाढ

पाकिस्तानच्या दक्षिण वझिरिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दक्षिण वझिरिस्तानच्या बादर घाटमाथ्यावर झालेल्या लष्कारावर हा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १२ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्कराने या हल्ल्याबाबत दुजोरा दिला आहे.

Pakistan News
Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

स्थानिक सुरक्षा दलाने सांगितलं की, लष्करांच्या जवानांवर नियोजनबद्ध हल्ला झालाय. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला तातडीने प्रत्युत्तरही देता आलं नाही. पाकिस्तानी तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हल्ल्यादरम्यान पाकिस्तान सैन्यांचं हत्यारही हिसकावून घेतल्याचे पाकिस्तानी तालिबान्यांनी दावा केला आहे. या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आता स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा एजन्सीने परिसरात पाकिस्तानी तालिबान्यांना शोधण्यास सुरुवात केली आहे.

Pakistan News
laxman Hake : जरांगेंची चाटायची चाटा, पण आधी राजीनामा द्या; 'पापड्या' म्हणत हाकेंचा राष्ट्रवादीच्या आमदारावर हल्लाबोल,VIDEO

खैबर फख्तूनख्वा प्रांतातील महिनाभरातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानी तालिबान्यांचं या भागावर नियंत्रण होतं. मात्र, २०१४ सालानंतर सैन्याच्या अभियनानंतर मागे पडावं लागलं होतं. २०२१ साली काबुलमध्ये तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमाभागात दहशतवादी हल्ले वाढले आहेत.

Pakistan News
Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

टीटीपी आणि अफगाणिस्तानातील तालिबानांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. मात्र, या दोन्ही संघटनेतील लोक हितसंबंध जपून आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, सीमाभागातील अफगाणिस्तान हटवण्यात अकार्यक्षम ठरतोय. त्यामुळे अफगाणिस्तानच्या सीमाभागातील परिसराचा वापर करून पाकिस्तानवर हल्ले सुरुच आहे. मात्र, हा दावा काबुलच्या अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com