Operation Sindoor A to Z Story Saam Tv News
देश विदेश

Operation Sindoor : १:०५ वाजता पाकिस्तानात घुसले, १:३० वाजता मिशन पूर्ण; २३ मिनिटांत खेळ खल्लास; 'ऑपरेशन सिंदूर'ची इत्यंभूत माहिती

Operation Sindoor A to Z Story : भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही.

Prashant Patil

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलाने आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. मध्यरात्री १.०५ वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन १:३० वाजता ते यशस्वीरित्या पूर्ण झालं. भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.

भारताकडून कोणत्या ९ ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)

१. बहावलपूर

जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय

आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी अंतरावर

२. मुरीदके

लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय

सीमेपासून ३० किमी अंतरावर

३. सवाई

लश्कर-ए-तोयबाचा अड्डा

सीमेपासून ३० कि.मी.दूर

४. गुलपूर

दशतवाद्यांचा अड्डा

ताबारेषेपासून ३५ कि.मी. दूर

हल्ल्यावेळी ८० दहशतवादी

५. बिलाल

जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ

सीमेपासून ३५ कि.मी.दूर

६. कोटली

नियंत्रण रेषेपासून १५ किमी अंतरावर

50 दहशतवादी उपस्थित होते.

७. बरनाला

दहशतवाद्यांचा अड्डा

सीमारेषेपासून १० कि.मी.दूर

८. सरजाल

जैश-ए-मोहम्मद चा अड्डा

सीमेपासून ८ कि.मी.दूर

९. महमूना

हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र

सीमेपासून १५ कि.मी.दूर

कोणकोणते दहशतवादी मारले गेले?

१. लष्कर ए तय्यबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम

२. धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल

३. हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी

४. मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू.

५. भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू.

६. याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू.

७. लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही कंठस्नान

८. लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT