Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात होळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यंदाच्या होळीच्या तिथीबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 3 मार्च की 4 मार्च, होळी नेमकी कधी साजरी केली जाणार आहे? याबाबत चर्चा सुरू आहे.
चंद्रग्रहणाचा योग आल्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली आहे. शास्त्रानुसार योग्य तिथी आणि परंपरेचा विचार करून खालील महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते.
होलिका दहन करताना सूर्यास्ताच्या वेळी पौर्णिमा तिथी असणं महत्वाचं आहे. सूर्यास्तावेळी पौर्णिमा असेल, तर त्या दिवशी दहन करणे योग्य ठरते.
भद्रा कालात कोणतेही शुभकार्य करणे टाळलं पाहिजे, असं शास्त्र सांगते. त्यामुळे भद्रा नसलेल्या काळातच होलिका दहन करणे आवश्यक आहे.
प्रदोषकाळात भद्रा असेल, तर भद्रा संपेपर्यंत प्रतीक्षा करावी. भद्रा मध्यरात्रीपूर्वी संपल्यास तिच्यानंतर दहन करणे उत्तम मानले जाते.
यंदा 3 मार्च रोजी पौर्णिमा असून त्या दिवशी स्नान-दान केले जाणार आहे. त्याच दिवशी चंद्रग्रहण लागणार असल्याने सूतक काळाचाही विचार करावा लागणार आहे.
शास्त्रानुसार रंगांची होळी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या प्रतिपदा तिथीला खेळली जाते. तर यंदा प्रतिपदा 4 मार्च रोजी येत असल्याने 4 मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जाणार आहे.
यामुळे 3 मार्च रोजी होलिका दहन आणि स्नान-दान पार पडेल, तर 4 मार्च रोजी रंगांची होळी उत्साहात साजरी केली जाईल. चंद्रग्रहण आणि सूतक यांचा विचार करूनच होळीचे नियोजन करणं जास्त शुभ मानलं जाणार आहे.