Bangladesh Clashes On Onion Export  
देश विदेश

Onion Export: बांगलादेशात हिंसाचारामुळे कांदा निर्यातीला फटका; नाशकातून होणारी कांदा निर्यात ठप्प

Bangladesh Clashes On Onion Export : आता बातमी कांद्या निर्यातीला बसलेल्या फटक्याची. बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका नाशकातील कांद्याला बसलाय. कारण भारताने सीमा सील केल्याने कांद्याचे शेकडो ट्रक अडकलेत. नाशिक जिल्ह्यामधून दररोज 50 ते 60 ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतात. त्यामुळे कोट्यवधी व्यवहार ठप्प झालेत. पाहूयात एक रिपोर्ट.

Girish Nikam

बांगलादेशमधील हिंसाचाराचा फटका नाशकातील कांद्याला बसलाय. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशमध्ये 50 हजार टन कांद्याच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली होती. मात्र तिथं उसळलेल्या हिंसाचारानंतर भारताने दोन्ही देशांची सीमा सील केली आहे. त्यामुळे कांद्याचे शेकडो ट्रक अडकल्याची माहिती आहे. नाशिकमधून दररोज 50 ते 60 ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतात. त्यामुळे कोट्यवधी आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. एवढेचं नाही तर देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशकडून 75 टक्के शेतमाल आयात होतो. भारतातून सर्वात जास्त कांद्याची निर्यात बांगलादेशालाच केली जाते. मागील चार वर्षात भारतातून बांगलादेशला झालेली कांद्याची निर्यात पाहूया.

एप्रिल आणि मे महिना

8,275 टन कांदा निर्यात

( 35 कोटी )

2023-24

7,24,714 टन कांदा निर्यात

( 1,555 कोटी )

2022-23

6,71,125 टन कांदा निर्यात

(897कोटी )

2021-22

6,58,721 टन कांदा निर्यात

(1,301 कोटी )

बुधवार सकाळपासून हळूहळू ट्रक बांगलादेशमध्ये जाण्यास सुरुवात झालीय. मात्र सीमा पूर्णपणे सुरु होण्यासाठी अजून दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांना कांदा नेहमीच रडवतो. बांगलादेशातील अराजकतेच्या निमित्तानं दरावर परीणाम व्हायला नको यासाठी सरकारनं उपाययोजना करण्याची मागणी होतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT