Muslim nations India Pakistan conflict : पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाला पाकिस्तानने आता धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केलाय.. तर मुस्लीम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला खुलं समर्थन दिलंय.. मात्र हे कोणते देश आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
पहलगाम हल्ल्यानंतर आता कुठल्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे.. त्यामुळे धडकी भरलेल्या पाकिस्तानने आता मुस्लीम कार्ड खेळलंय.. तर मुस्लीम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनकडे पाकिस्तानने मदतीसाठी भीक मागितलीय.. तर चीन आणि तुर्कीनंतर आता मुस्लीम देशांच्या संघटनेनं पाकिस्तानला म्हणजेच अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठींबा दिल्याचं समोर आलंय...मात्र कोणते देश कुणाच्या सोबत आहेत? पाहूयात....
कोणते देश कुणासोबत?
सीरिया
इराक
अझरबैजान
तुर्की
मलेशिया हे देश पाकिस्तानसोबत आहेत....
तर सौदी अरेबिया, युएई, कतार, ओमान, कुवैत, बहरीन आणि इजिप्त हे देश भारतासोबत असल्याचं चित्र आहे....
मुस्लीम देशांच्या संघटनेत वर्चस्वाचा वाद आहे.. त्यामुळे तुर्की पाकच्या बाजूने उभी असली तरी सौदी अरेबिया मात्र भारताला पाठींबा देत आहे... त्यामुळे 57 देशांपैकी 20-25 देश भारताविरोधात भूमिका घेत असले तरी अनेक देशांच्या व्यापारी नाड्या भारताच्या हाती आहेत... त्यामुळे ठरावाला पाठींबा देणारे देश युद्ध सुरु झाल्यास पाकिस्तानला पाठींबा देण्याची शक्यता कमीच असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय..
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन बंदुकीच्या जीवावर नंगानाच केला... त्याचा निषेध करणं सोडून मुस्लीम देश दहशतवादाला पाठींबा देणाऱ्या पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहत असतील तर भारतानेही तेल आयातीपासून ते व्यापारी निर्बंध टाकून या देशांचा माज मोडायला हवा.... त्यामुळेच इतर राजनैतिक पर्यायांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठींबा मिळवून पाकिस्तानला भुईसपाट करण्याची योजना आखायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.