IPS SHEFIN AHMED DIES AT 50 AFTER LONG BATTLE WITH CANCER; FORMER ODISHA CID IG saam tv
देश विदेश

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

IPS Officer Died: केरळचे मूळ रहिवासी आणि ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी शेफिन अहमद के. यांचे निधन झालंय. ते एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. ते बऱ्याच काळापासून कर्करोगावर उपचार घेत होते.

Bharat Jadhav

  • ओडिशा केडरचे IPS अधिकारी शेफीन अहमद यांचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन झाले.

  • शेफीन अहमद हे २००३ बॅचचे IPS अधिकारी होते.

  • त्यांनी CID-क्राइम ब्रँचचे महानिरीक्षक (IG) म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी शेफीन अहमद यांचे निधन झालंय. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेफीन अहमद यांनी ओडिशातील सीआयडी-क्राइम ब्रँचचे महानिरीक्षक (IG) म्हणून काम पाहिले होते. मूळचे केरळचे असलेले हे आयपीएस अधिकारी राज्यातील एका खासगी रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होते. २००३ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या शेफीन यांचे वय ५० वर्षे होते. त्यांचे वडील केरळमधील एक प्रमुख नेते आहेत.

सीटू (CITU) नेते हबीब यांचे पुत्र शेफिन अहमद यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी केरळमध्ये प्रतिनियुक्तीवरही काम केले होते. त्यांनी तिरुवनंतपुरम ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांसह विविध पदे भूषवली होती.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

शेफिन अहमद यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी शोक व्यक्त केलाय. सीआयडी-सीबी (CID-CB) चे महानिरीक्षक (IG) म्हणून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शेफिन अहमद के.के. यांच्या अकाली निधनामुळे आपल्याला अत्यंत दुःख झाले असल्याचे माझी यांनी म्हटलंय. राज्य आणि ओडिशा पोलिसांसाठी त्यांनी दिलेली समर्पित सेवा सदैव स्मरणात राहील. त्यांनी या अधिकाऱ्याचे कुटुंबीय, सहकारी आणि आप्तेष्टांप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केलीय.

मंगळवारी अंत्यसंस्कार होणार

शेफिन अहमद यांचे पार्थिव सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत वट्टियूरकावू येथील त्यांच्या घरी नेले जाईल. त्यानंतर मंगळवारी अंत्यसंस्कारासाठी कोल्लममधील त्यांच्या मूळ गावी, ओचिरा येथे नेले जाईल. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे सहकारी शेफिन अहमद यांनी कर्करोगाविरुद्ध दिलेला प्रदीर्घ आणि धैर्याचा लढा अपयशी ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

SCROLL FOR NEXT