NPCIL Recruitment
NPCIL Recruitment Saam Tv
देश विदेश

NPCIL Recruitment 2023: NPCIL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 56 हजार रुपये मिळेल पगार

Priya More

NPCIL Job: नोकरीच्या शोधामध्ये (Job Search) असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (Nuclear Power Corporation Of India Limited) विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एनपीसीआयएलच्या (NPCIL Recruitment 2023) अधिकृत वेबसाईटला www.npcilcareers.co.in भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात.

एनपीसीआयएलच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेअंतर्गत डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) आणि ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर (Junior Hindi Translator) या पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 12 मे 2023 पासून सुरु होणार आहे. तर 29 मे 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकता. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर उमेदवारांना अधिसूचना वाचावी लागेल.

NPCIL Recruitment 2023: महत्त्वाच्या तारखा -

अधिसूचना जारी झाल्याची तारीख - 6 मे 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - 12 मे 2023

अर्ज करण्याची अंतिम तारीख - 29 मे 2023

NPCIL Recruitment 2023: रिक्त पदांचा तपशील -

एकूण पदं - 128

डेप्युटी मॅनेजर (एचआर)- 48

डेप्युटी मॅनेजर(एफ अँड ए)- 32

डेप्युटी मॅनेजर (सी अँड एमएम )- 42

डेप्युटी मॅनेजर (लीगल)- 2

ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर - 4

NPCIL Recruitment 2023: वयोमर्यादा -

डेप्युटी मॅनेजर - किमान वय18 वर्षे असावे. तर कमाल वय 30 वर्षे असावे

ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर - किमान वय 18 वर्षे असावे. तर कमाल वय 28 वर्षे असावे

NPCIL Recruitment 2023: वेतन -

डेप्युटी मॅनेजर - 56,100 प्रतिमाह (वेतन स्तर- 10)

ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर - 35,400 प्रतिमाह (वेतन स्तर- 6)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT