Sharad Pawar on Bjp : आता भाजपविरोधात प्रचार करणं सोप्पं होईल; शरद पवारांनी एका वाक्यातच राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट केली...

Sharad Pawar On SC : शरद पवार यांच्या एका वाक्याने पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट झाली, म्हणाले...
Sharad Pawar on Bjp
Sharad Pawar on Bjp Saam TV
Published On

Sharad Pawar on Bjp : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आजच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या या निकालानंतर आता भाजपविरुद्ध प्रचार करणं सोप्प होईल, असं पवार म्हणाले आहेत.

तसेच महाविकास आघाडी एकत्र मिळून आता अधिक जोमाने काम करू, असंही ते म्हणाले आहेत. कोश्यारीचं नाव हे लोकांच्या सतत लक्षात राहील, म्हणत त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोलाही लगावला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. (Breaking Marathi News)

Sharad Pawar on Bjp
Shahaji Bapu Patil Reaction: संजय राऊतांनी आता गुवाहाटीच्या जंगलात जावं; शहाजीबापू पाटलांचा खोचक टोला

उद्धव ठाकरेंवर काय म्हणाले पवार?

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर परिस्थिती बदलता आली असती, असं सुप्रीम कोर्टाने निकाल देताना म्हटलं आहे. याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले आहेत की, ''ठाकरेंच्या राजीनाम्याविषयी मी पुस्तकात लिहिलं आहे. मी पुस्तकात आपलं मत मांडल्याने काही मित्र नाराज झाले. मात्र, मूळ राष्ट्रीय पक्षाच्या सूचनेने लोक निवडणूक लढवतात, निवडून येतात, त्या पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे.''

'नैतिकता आणि भाजपचा काही संबंध का?'

भाजपवर हल्लाबोल करत पवार म्हणाले, ''नैतिकता आणि भाजप यांचा काही संबंध आहे, असं मला वाटत नाही.'' पवार पुढे म्हणाले, 'महाविकास आघाडी अधिक जोमानं काम करणार. राज्यपालांची भूमिका चुकीचीच होती. राज्यकर्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तीव्र भूमिका बांधली.''

Sharad Pawar on Bjp
Bhagat Singh Koshyari On SC : सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले...

सत्तेचा सात्त्याने गैरवापर, पाटील यांना ईडीच्या नोटिशीवर पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, सत्तेचा सात्त्याने गैरवापर केला जात आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com