नोएडामधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. नोएडाच्या एका घरावर ईडीने छापा टाकून अश्लिल व्हिडिओच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. जोडप्याकडून अश्लिल व्हिडिओचा रॅकेट चालवण्यात येत होता. या रॅकेटमधून जोडपे कोट्यवधी पैसे कमवत होते. ईडीने केलेल्या तपासात आतापर्यंत या जोडप्याने ४०० हून अधिक मॉडेल्सचे अश्लील व्हिडिओ शुट केले आहेत. यातून त्यांनी बक्कळ पैसा कमवला आहे.
जोडपं मॉडेल्सना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून त्यांचे शुट करायचे. मात्र, घरातच त्यांचा हा कारभार सुरू होता, तर कुणालाच याचा संशय आला कसा नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे. शेजाऱ्यांची देखील यासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र, त्यांनाही काही कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
रॅकेट कसे चालत होते?
आरोपी उज्जवल किशोर आणि त्याची पत्नी नीलू श्रीवास्तव "सबडिजी" नावाजी कंपनी चालवत होते. जोडप्याने आधी मॉडेल्सचे ऑडिशन घेतले. त्यांनी ऑडिशनच्या जाहीराती सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. मॉडेल्स ठरवल्यानंतर जोडपे त्यांना पैशांचे आमिष दाखवून अश्लील व्हिडिओ शूट करण्यासाठी भाग पाडत असे. मॉडेल्सचे ५ प्रकारचे शूट केल्यानंतर त्यांचे व्हिडिओही शूट करायचे. हा प्रकार काही महिना सुरूच होता.
कुणालाही संशय आला नाही, कारण..
उज्जवल आणि नीलूच्या शेजाऱ्यांना या रॅकेटबद्दल काहीच कल्पना नव्हती. कारण हे जोडपं कुणाशीही मिळून मिसळून राहत नव्हते. मॉडेल्स दररोज सकाळी ११ ते दुपारी १२ च्या दरम्यान त्यांच्या घरी जायचे. तसेच ३ ते ४ तासांनी निघून जायचे. आरोपी पूर्वी परदेशात कामाला होता. त्यामुळे त्यांना संशय आला नाही. मात्र, ईडीने त्यांना रंगेहाथ पकडून त्यांचा भंडाफोड केला. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.