Noida Car Accident CCTV Footage Saam Tv
देश विदेश

Noida Car Accident CCTV: पुण्यासारखीच घटना नोएडात घडली, सुसाट आलीशान कारची धडक, आजोबा हवेत उडाले, VIDEO बघून संताप होईल!

Noida Car Accident CCTV Footage: पुण्यातील पोर्श कारचे अपघाताची घटना ताजी असतानाच देशात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. नोएडातदेखील हिट अँड रनची अशीच एक घटना घडली आहेत. नोएडात एका कारच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील पोर्श कारचे अपघाताची घटना ताजी असतानाच देशात अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. नोएडातदेखील हिट अँड रनची अशीच एक घटना घडली आहेत. नोएडात एका कारच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नोएडात एका ऑडी कारने वृद्ध व्यक्तीला धडक दिली आहे. वृद्ध व्यक्ती रस्ता क्रॉस करत होते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने एक भरधाव वेगाने गाडी आली आणि आजोबांना धडक दिली. या अपघातात आजोबांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर २४ भागातील कांचनगंगा अपार्टमेंटजवळ हा अपघात झाला आहे. सकाळी साडेसहा वाजता एक वृद्ध व्यक्ती रस्ता ओलांडत असताना एका कारने त्यांना उडवले आहे. जनक देव शाह असे वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरात एक आजोबा रस्ता क्रॉस करताना दिसत आहे. रस्ता क्रॉस करत असताना एका बाजून भरधाव वेगात असणारी ऑडी कार येते. ही कार त्या व्यक्तीला जोरदार धडक देते आणि निघून जाते. ही धडक एवढी जोरात बसली की, जनक शाह काही फूट उंच उडून मग खाली पडले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी कारचालकाच्याविरोधात आयपीसी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

Idli Recipe : रात्रीचा भात भरपूर उरलाय? झटपट बनवा मऊसर इडली

SCROLL FOR NEXT