Buldhana Accident News: बुलढाण्यात चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार पलटली; १ जागीच ठार ४ गंभीर जखमी

Car Accident On Ambetakli Bori Adgaon Road: बुलढाण्यात पुन्हा एक भीषण कार अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १ ठार जर ४ जण जखमी झाले आहेत.
कार अपघात
Buldhana Accident NewsSaam Tv

संजय जाधव साम टीव्ही, बुलढाणा

राज्यात अपघातांचं सत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलढाण्यात पुन्हा एक भीषण कार अपघात समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोड ही दुर्घटना घडलेली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर आणखी चारजण जखणी झाल्याची माहिती मिळत आहे.

भरभाव वेगात असल्यामुळं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली. त्यामुळे हा अपघात आज (२६ मे) पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाल्याचं सांगितलं जात आहे. ही घटना (Buldhana Accident News) आंबेटाकळी ते बोरी अडगाव रोडवर घडली आहे. कार भरधाव वेगात असल्याची माहिती मिळत आहे. वेगामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अन् दुर्घटना घडली. यामध्ये एकजण ठार तर चारजण जखमी झाले (Car Accident) आहेत.

ही कार शेगावकडे जात असताना हा अपघात झाला आहे. नागरिकांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना लगेच खामगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू (Road Accident) आहेत. कारमधील सर्वजण गडचिरोलीचे असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये देवराव रावजी भंडारकर (वय ५५) वर्ष राहणार गडचिरोली, हे जागीच ठार झाले आहेत.

कार अपघात
Buldhana Accidnet News : पुण्याला निघालेल्या खासगी बसचा टायर फुटला, कळमनुरीतील 12 प्रवासी जखमी

कारमधील कांता देवराव भंडारकर (वय ५० वर्ष), जयदेव नामदेव नाकाडू (वय ४० वर्ष), जयश्री राऊत (वय १६ वर्ष) आणि समृद्धी कोमलवार (वय ६ वर्ष) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व राहणार गडचिरोली (Accident News) जिल्ह्यातील कुरखेड तालुक्यामधील तळेगाव येथील आहेत. त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालायत रेफर केलं आहे.

कार अपघात
UP Road Accident: देवदर्शनाला निघाले पण वाटेतच काळाची झडप; ट्रक-बस अपघातात ११ भाविकांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com