Nobel Prize 2024:  saam tv
देश विदेश

Nobel Prize 2024: या देशाच्या शास्त्रज्ञांना यंदाचं वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल; 'मायक्रो-आरएनए'मध्ये महत्त्वाचं संशोधन

Nobel Prize 2024 Winners: व्हिक्टर अम्ब्रोस आणि गॅरी रुव्हकुन यांनी वैद्यकशास्त्रील मायक्रो 'आरएनए' चा शोध लावल्या बद्दल 'नोबेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकन शास्त्रज्ञ 'व्हिक्टर अम्ब्रोस' आणि 'गॅरी रुव्हकुन' यांना सोमवारी ७ ऑक्टोबर २०२४ रोजी 'नोबेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला. व्हिक्टर अम्ब्रोस आणि गॅरी रुव्हकुन यांनी मायक्रो 'आरएनए' चा शोध लावला म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. मायक्रो 'आरएनए' हे जनुकांच्या क्रियाशीलतेच्या नियमनासंबंधीचे मुलभूत तत्व मांडत असते.

मानवी शरीरात सूक्ष्म आरएनए कसे कार्य करतात हे समजण्यास मदत झाली. या संशोधनांतुन जनुके मानवी शरीराच्या विविध गोष्टींना कसे निर्माण केले जातात हे स्पष्ट समजण्यास मदत झाली. हा पुरस्कार स्वीडनमधल्या 'कॅरोलिंस्का इंस्टिट्युट'मध्ये जाहीर करण्यात आला. या शोधावर अनेक शास्त्रज्ञ प्रचंड खुश आहेत. कारण, आरएनएच्या शोधामुळे जनुके नियमनाचे एक नविन तत्वचं तयार करण्यात आले आहे.

शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हे तत्व माणसाच्या बहुपेशीय जीवांसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सिद्ध झाले आहे. या संशोधनात मानवी जीनोम एक हजारांहून अधिक मायक्रो-आरएनएसाठी कोडेड आहे. म्हणजेच मानवी शरीर हे आइडेंटिकल जेनेरिक इन्फॉर्मेशन पद्धतीने म्हणजेच समान प्रकाराने बनलेले असते. मात्र प्रत्येक मानवी शरीराच्या पेशींचे आकार आणि कार्य यात बरीच तफावत आहे.

चेतापेशींचे इलेक्ट्रिकल इंपल्स हे हृदयाच्या पेशींच्या ठोक्यांपेक्षा वेगळे असतात. तसेच पचनक्रियेची जबाबदारी असलेली यकृत पेशी ही मूत्रपिंडाच्या पेशींपेक्षा वेगळी असते आणि वेगळे कार्य करते. मूत्रपिंडाच्या पेशी या रक्तातून युरिया फिल्टर करतात. त्याचबरोबर डोळ्यातल्या पडद्यात पेशीं असतात. त्या पेशींमध्ये एक वेगळीच प्रकाश क्षमता असते. त्या पेशी संसर्गाशी लढण्यासाठी मेकॅनिजम तयार करतात.

शास्त्रज्ञांचे शोध जीवांच्या उत्क्रांतीच्या आणि कार्य करण्याच्या पद्धतीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सिद्ध होत आहेत. हे अम्ब्रोस यांनी संशोधन केले. त्यांना हार्वर्ड विद्यापीठात पुरस्कार मिळाला. ते सध्या युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स मेडिकल स्कूलमध्ये नॅचरल सायन्सेसचे प्राध्यापक आहेत.नोबेल समितीचे सरचिटणीस तर थॉमस पर्लमन रुवकुन हे संशोधन मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्रेझेंट होते. तेथे सध्या प्राध्यापक आहेत.

Edited By: Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT