डीएनएची रचना शोधणारे अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचं निधन झाले आहे. वयाच्या ९७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २० व्या शतकातील सर्वात मोठा वैज्ञानिक शोधांपैकी एक म्हणजे डीएनएची डबल हेलिक्स रचना, जी वॉटसन यांनी १९५३ साली ब्रिटिश शास्त्रज्ञ फ्रान्सिस क्रिक यांच्यासह शोधली.
कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीने वॉटसन यांच्या निधनाची माहिती बीबीसीला दिली. या संस्थेत त्यांनी अनेक दशके संशोधन केले होते. डीएनएच्या डबल हेलिक्स रचनेचा शोध लावल्याबद्दल त्यांना १९६२ साली मॉरिस विल्किन्स आणि फ्रान्सिस क्रिक यांच्यासोबत नोबेल पारितोषिक देण्यात आलं.
दरम्यान, वॉटसन अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडले होते. २००७ साली 'द टाईम्स' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वॉटसन यांनी आफ्रिकन लोकांवर वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबच्या कुलगुरूपदावरून हटवण्यात आलं होतं.
२०१९ साली त्यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं. यानंतर त्यांच्याकडून चांसलर एमेरिटस, प्रोफेसर एमेरिटस, आणि मानद विश्वस्त ही सर्व पदं काढून घेण्यात आली. संस्थेनं म्हटलं की, 'डॉ. वॉटसन यांचे विधान चुकीचे आहे. विज्ञानाने त्यास समर्थन दिलेलं नाही', असं ते म्हणाले. २०१४ साली वंशावरील विधानांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यांना वैज्ञानिक समुदायापासून स्वत:ला वेगळं झाल्यासारखं वाटलं.
यामुळे वॉटसन यांनी आपलं नोबेल सुवर्णपदक लिलावात विकलं. हे पदक ४.८ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३.६ दशलक्ष पौंड) ला विकले गेले. माहितीनुसार, रशियन अब्जाधीशाने हे पदक विकत घेतलं आणि नंतर सन्मानपूर्वक ते वॉटसन यांना परत दिलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.