Petrol shortage in india latest news SAAM TV
देश विदेश

Fuel shortage: पेट्रोल-डीझेलच्या किंमतींचा भडका उडणार? केंद्र सरकारचं मोठं विधान, LPG तुडवड्यावरही दिली महत्वाची माहिती

Petrol shortage in india latest news: देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. कोणतीही टंचाई नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतात पेट्रोल डिझेलची टंचाई होणार अशा चर्चा होत्या. परंतु केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या पुरवठ्याबाबत सर्वसामान्यांना आश्वासन दिलंय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितलं की, देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

देशाची वार्षिक रिफायनिंग क्षमता जवळपास २६ कोटी टन आहे. सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केलं की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही आणि कोणत्याही पेट्रोल पंपावर कमतरता नाही.

पेट्रोलियम टर्मिनलमध्ये पुरेसा साठा

शर्मा यांच्या सांगण्यानुसार, पेट्रोलियम टर्मिनलमध्येही पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि गोंधळून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. गेल्या दोन दिवसांत देशातील काही भागात पेट्रोल पंपांवर लांब रांगा आणि पॅनिक परिस्थिती दिसून आली.

LPG च्या पुरवठ्यात वाढ

केंद्र सरकारने कमर्शियल एलपीजीच्या पुरवठ्यात २० टक्क्यांनी वाढ केली असून ती ५० टक्क्यांपर्यंत झाली आहे. २१ मार्च रोजी हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये सरकारने ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन आणि प्रवास करणाऱ्या कामगारांना प्राधान्य देण्याच्या सूचना राज्यांना केल्या आहेत.

आतापर्यंत 26 राज्यांना सुमारे 22,000 टन कमर्शियल एलपीजीचं वाटप करण्यात आलं आहे. मंगळवारी सुमारे 30,005 किलोचे सिलेंडर जारी करण्यात आलेत. घरगुती एलपीजीची कमतरता नसून ऑनलाइन बुकिंग 92 टक्के आहे. तसंच डिलीव्हरी सामान्यपणे होत असल्याचंही शर्मा यांनी सांगितलं आहे.

पीएनजी म्हणजेच पाइप्ड नॅचरल गॅस विस्तारावर भर देत सरकारने मंगळवारी आणखी एक गॅझेट नोटीफिकेशन जारी केलंय. ज्यामध्ये अर्ज शुल्क आणि मंजुरीची अंतिम मुदत कमी केली आहे.

सीएनजीची कमतरता नाही

सीएनजी वाहतुकीसाठी देखील पूर्ण प्रमाणात उपलब्ध करून दिला जातोय. अनेक कंपन्या 500 रूपयांपर्यंत मोफत गॅस किंवा सिक्योरिटी डिपॉजिट माफ करण्याला प्रोत्साहन देत आहेत. पीएनजीच्या विस्ताराला पाठिंबा दिल्यास राज्यांना अतिरिक्त 10 टक्के व्यावसायिक एलपीजी देण्याचा प्रस्तावही सरकारने ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनैतिक संबंधांवरून वाद, गणपती मंडळाच्या माजी अध्यक्षाची हत्या; दोघांना जन्मठेप, वडिलांसह मुलांना मिळणार भरपाई

Maharashtra Live News Update: साताऱ्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

या दोन महिलांना बघितलंत का? १० वर्षांपासून बेकायदा वास्तव्य; ATS ने धाड टाकली अन् खरा चेहरा झाला उघड

Shocking : 'खरात'सारखाच आणखी एक इंजेक्शनवाला बाबा! उपचाराच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

Summer Eye Care Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT