अमेरिकेचा इराणला 48 तासांचा अल्टीमेटम, इराणची अण्वस्त्रं अमेरिकेच्या टार्गेटवर?

Trump Warns Iran of Massive Retaliation Amid Rising Tensions: अमेरिकेचं लष्करी तळ असलेल्या दिएगो गार्सिया बेटावर हल्ला करण्यापर्यंत इराणची मजल गेलीय. अशातच आता या हल्ल्यानं चवताळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराख करण्याचा चंगच बांधलाय. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
Rising tensions between the US and Iran after a reported missile strike near Diego Garcia military base.
Rising tensions between the US and Iran after a reported missile strike near Diego Garcia military base.Saam Tv
Published On

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मित्रदेशांकडे अमेरीकेने भीक मागितली. मात्र, इराणने तब्बल 4 हजार किलोमीटर अंतरावर अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या लष्करी तळ असलेल्या बेटावर मिसाईल डागले. आणि अमेरिकेला धडकी भरली. त्यानंतर चवताळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराख करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय. होर्मुझ जलमार्ग खुला केला नाहीतर थेट इराणच्या उर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकीच ट्रम्प यांनी दिलीय. इराणमधील कोणते पॉवर प्लांट्स अमेरिकेच्या टार्गेटवर आलेत ते पाहूयात..

इराणची बुशेहर, नतान्झ, फोर्डो आणि इस्फाहान ही प्रमुख अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या निशाणयावर आहेत.

दमावंद कंबाइंड सायकल पॉवर प्लांट हा इराणमधील सर्वात मोठ्या औष्णिक वीज प्रकल्पांपैकी एक आहे. तेहरानजवळील 2,868 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे.

आग्नेय इराणमध्ये असलेला केरमान कंबाइंड सायकल पॉवर प्लांट 1,912 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे.

रामिन वाफेवर चालणारा वीज प्रकल्प खुझेस्तान प्रांतात असून याची क्षमता 1,890 मेगावॅट इतकी आहे.

नेका पॉवर हा माझंदरान प्रांतातील 1,760 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प आहे.

1,600 मेगावॅट क्षमतेचा इस्फाहानमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्प

खरंतर, अमेरिकेनं धमकी दिली असली तरी इराणही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. आमच्या वीज वितरण प्रणालीवर कोणताही हल्ला झाला तर या प्रदेशातील इस्त्रायल आणि अमेरिकन ऊर्जा संसाधनांना आम्ही टार्गेट करू, असं प्रत्युत्तर इराणनं दिलंय. त्यामुळे इराणविरोधातील युद्धात ट्रम्प यांच्या गळ्याभोवती फास बनलेला होर्मुझ जलमार्ग मध्य-पूर्वेतील युद्ध विध्वंसक वळणावर नेणार, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com