Nitish Kumar submits resignation as Bihar Chief Minister, accompanied by senior leaders during a key political transition. saam tv
देश विदेश

अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला, देशाच्या राजकारणात खळबळ

Nitish Kumar Resign As Bihar Chief Minister: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला असून राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.

Omkar Sonawane

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल सय्यद अता हसनैन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय चौधरी होते. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. दरम्यान भाजप आमदारांची बैठकही सुरू झाली आहे. या बैठकीनंतर एनडीए विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.

बिहारच्या राजकारणात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार निशांत कुमार हे बिहारचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. JDU पक्षातूनच उपमुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर मंत्रीमंडळात BJP मधून 14 आणि JDU मधून 15 मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच चिराग पासवान यांच्या पक्षाला देखील 2 मंत्री मंत्रीपदे दिले जाण्याचे सांगितले जात आहे. तर बिहार विधानसभा अध्यक्षवर दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असून JDU या पदासाठी कुठलाही तडजोड करण्यास तयार नाहीये.

कोण होणार मुख्यमंत्री?

नितीश कुमार यांनी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर बिहारचा मुख्यमंत्री कोणार अशी चर्चा देशाच्या राजकारणात सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचा मुख्यमंत्री केला जाऊ शकतो तर उपमुख्यमंत्रीपदावर नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांची वर्णी लागू शकते. बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडच्या पारगाव शिरस गावात भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार

राज्याला मिळाले नवे मुख्यमंत्री, उद्या होणार शपथविधी

Madhavi Nimkar Photos: 'जणू आकाशातून अप्सराच अवतरली!' माधवीचं मराठमोळं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

Weather Update : अकोल्यात सूर्य ओकतोय आग, जगातील उष्ण शहरांच्या यादीत दुसरं नाव; आजचं तापमान किती?

राज्यात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी; हे करा-हे टाळा’ SOP गाईडलाईन्स

SCROLL FOR NEXT