Bihar CM Nitish Kumar introduces domicile policy in teacher recruitment; only locals eligible under TRE-4 and TRE-5. saam tv
देश विदेश

Teacher Recruitment: शिक्षक भरतीत आधी बिहारी,नंतर परकीयांना संधी; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Domicile Policy in Bihar Teacher Recruitment: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नवीन अधिवास-आधारित शिक्षक भरती धोरण लागू केले आहे. या निर्णयामुळे फक्त स्थानिक रहिवासीच TRE-4 आणि TRE-5 नोकऱ्यांसाठी पात्र असणार आहेत.

Bharat Jadhav

  • बिहारमध्ये शिक्षक भरतीसाठी अधिवास धोरण लागू केलं जात आहे.

  • आता भरतीमध्ये केवळ बिहारचे रहिवासी पात्र ठरणार आहेत.

  • हे धोरण TRE-4 आणि TRE-5 या परीक्षांपासून लागू होईल.

  • महाराष्ट्रातही भूमिपुत्र धोरणासाठी राजकीय मागण्या सुरू आहेत.

वाढत्या परराज्यातील लोंढ्यावरून राज ठाकरे नेहमी आक्रमक भूमिका घेत असतात. युपी-बिहारमधील वाढत्या लोंढ्यांच्या प्रश्नावरून राज ठाकरे सरकारला धारेवर धरत असतात. महाराष्ट्रात नोकरीसाठी आधी स्थानिकांना संधी मिळाली पाहिजे, नंतर परराज्यातील लोकांचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे करतात. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केलीय.

काही दिवसात बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. या आधीच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिक्षक भरतीमध्ये अधिवास धोरण लागू करण्याचा निर्णय घेतलाय. या धोरणामुळे, भरतीमध्ये फक्त बिहारमधील रहिवाशांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. आता बिहारमध्ये भूमिपुत्रांनाच संधी मिळणार आहे. दरम्यान हा बदल TRE-4, TRE-5 पासून लागू केला जाणार आहे.

डोमिसाईल म्हणजे काय?

नागरिक हा त्या राज्यातील रहिवाशी असावा. त्याचे घर किंवा निवासस्थान त्या राज्यात असले पाहिजे. याशिवाय पालक रहिवासी असणे, पती रहिवासी असणे, घर असणे इत्यादी अनेक अटींच्या आधारे अधिवास श्रेणीत समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान राज्यात हा निर्णय लागू झाला तर त्याच राज्यातील लोकांना या भरतीमध्ये अर्ज करता येतो.

राज्यातील रहिवाशांनाच नोकरी देताना प्राधान्य दिले जाते. बिहारमध्ये डोमिसाईलचा निर्णय लागू झाला तर लवकरच होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये बिहारमधील लोकांना प्राधान्य दिले जाईल.

दरम्यान बिहारमध्ये शिक्षक भरती परीक्षेत डोमिसाईल धोरण लागू करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या मागणीसाठी उमेदवारांनी १ ऑगस्ट रोजी पायी मोर्चा काढला होता. विद्यार्थी नेते दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन मोर्चा काढला होता. सर्व उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालायचा होता. ते मुख्यमंत्री निवासस्थानाकडे जाण्यासाठी निघाले होते. पण, पाटणा पोलिसांनी त्यांना जेपी गोलंभरजवळ रोखलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

SCROLL FOR NEXT