Bihar Congress MLA Saam Tv
देश विदेश

Bihar News: बिहारमध्ये फ्लोर टेस्टआधी राजकीय घडामोडींना वेग, काँग्रेसने आपल्या आमदारांना केलं हैदराबादला रवाना

Bihar Politics: बिहारमध्ये भाजपसोबत नवे सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 12 फेब्रुवारीला फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करायचे आहे.

Satish Kengar

Bihar Politics:

बिहारमध्ये भाजपसोबत नवे सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना 12 फेब्रुवारीला फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करायचे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने खबरदारी म्हणून राज्यातील आपल्या आमदारांना रविवारी हैदराबादला पाठवले आहे. यापूर्वी झारखंडमध्येही झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) आपल्या आमदारांना हैदराबादला पाठवले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील महाआघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीपासून स्वतःला दूर केले होते. यानंतर त्यांनी पुन्हा भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. आत्तापर्यंत भाजपविरोधी भूमिका घेणारे नितीश कुमार यांनी निवडणुकीपूर्वीच एनडीएमध्ये सामील झाले आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे काँग्रेसने आमदारांना हैदराबादला केलं रवाना

शनिवारी दिल्लीत बिहार काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत 19 पैकी 17 आमदार सहभागी झाले होते. अशातच त्यांच्यात फूट पडू नये, यासाठी काँग्रेसने त्यांना हैदराबादला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

बिहार विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील नव्या एनडीए सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागले. आधी त्यांना 10 फेब्रुवारी रोजी बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र आता ही तारीख बदलून 12 फेब्रुवारी करण्यात आली आहे. 9 ते 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यपाल उपलब्ध नसल्यामुळे हे करण्यात आले.

असं आहे बिहार विधानसभेचे गणित

बिहारमध्ये विधानसभेच्या सध्या 243 जागा आहेत. त्यात भाजपचे 78 आमदार आहेत. तसेच एनडीएकडे नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 45, एचएएमचे (हिंदुस्थान अवाम मोर्चा) 4 आणि एक अपक्ष आमदार आहेत. बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे. अशातच एकूण 128 आमदारांसह बहुमत सिद्ध करण्याचे नितीश यांच्यासमोर कोणतेही आव्हान दिसत नाही. नितीश कुमार यांच्यासह राज्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT