Nirmala Sitharaman: 'आरबीआयचे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन अयशस्वी', अर्थमंत्री सीतारामन यांनी का केली ही टीका?

Nirmala Sitharaman Vs Raghuram Rajan: रघुराम राजन आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नरवर टीका केली.
Nirmala Sitharaman Vs Raghuram Rajan
Nirmala Sitharaman Vs Raghuram RajanSaam Tv
Published On

Nirmala Sitharaman Vs Raghuram Rajan:

आरबीआयचे माजी प्रमुख रघुराम राजन आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले, असं म्हणत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर टीका केली आहे.

अलीकडेच रघुराम राजन यांनी त्यांच्या एका वक्तव्यात म्हटले होते की, ''विकसित देश होण्यासाठी भारताने 9 ते 10 टक्के जीडीपी वाढीचे लक्ष्य ठेवले पाहिजे.'' आपल्या वक्तव्यात राजन म्हणाले होते की, ''जर भारताचा विकास सध्याच्या दराने झाला तर 2047 पर्यंत तो विकसित देशांच्या श्रेणीत येऊ शकणार नाही.'' यावरच बोलताना सीतारामन असं म्हणाल्या आहेत. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nirmala Sitharaman Vs Raghuram Rajan
Uddhav Thackeray: 'फोडाफोडीने तुमचा पक्ष संपला; माझी शिवसेना वाढत चालली...' उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, देशातील बँकिंग व्यवस्था अडचणीत असताना रघुराम राजन यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. सीतारामन म्हणाल्या की, आरबीआय प्रमुख म्हणून रघुराम राजन बँकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले. (Latest Marathi News)

अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीत सीतारामन यांनी सांगितले की, राजन भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर म्हणून अपयशी ठरले आहेत. बँकिंग नियामक म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही.

Nirmala Sitharaman Vs Raghuram Rajan
Realme Days Sale: 8 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन, फीचर्सही आहेत दमदार

त्या म्हणाल्या की, ''रघुराम राजन यांनी बँकांना नियम सांगायला हवे होते आणि त्यांना बाह्य दबावापासून संरक्षण मिळायला हवे होते.'' निर्मला सीतारामन यांच्या म्हणण्यानुसार, ''राजन यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे की, ते अर्थतज्ज्ञ आहेत की प्रत्येक वेळी ते बोलतात राजकारण्यांची टोपी घालतात.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com