USA Gunfire Shooting Club x
देश विदेश

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

New York Shooting : अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरातील टेस्ट ऑफ द सिटी लाउंज या क्लबमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आणि आठजण गंभीररित्या जखमी झाले.

Yash Shirke

  • न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन भागातील क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला, तर आठजण गंभीर जखमी झाले.

  • हल्लेखोरांनी पहाटे क्लबमध्ये अंधाधुंद गोळीबार केला; घटनास्थळावर तब्बल ३५ गोळ्या आणि १ बंदूक आढळली.

  • जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

USA New York Shooting : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. न्यूयॉर्कमधील एका क्लबमध्ये गोळीबार झाला. या घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून आठजण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे न्यूयॉर्क पोलीस विभागाने सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क शहरातील क्लबमध्ये काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. स्थानिक वेळेनुसार पहाटे तीन - साडेतीनच्या सुमारास क्लबमध्ये गोळीबार झाला. ही घटना न्यूयॉर्कमधील ब्रुकलिनच्या क्राउन हाइट्स येथील टेस्ट ऑफ द सिटी लाउंजमध्ये घडली आहे. या क्लबमध्ये अनेक शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला.

न्यूयॉर्क पोलीस विभागाच्या आयुक्त जेसिका टिश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रुकलिनच्या टेस्ट ऑफ द सिटी लाउंजमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यात आठ जण जखमी झाले असून जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जेसिका टिश यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी संवाद साधला. न्यूयॉर्क शहरातील ही एक भयानक गोळीबाराची घटना आहे. पोलिसांनी टेस्ट ऑफ दि सिटी लाउंज येथून ३५ गोळ्या आढळल्या आहेत. याशिवाय जवळच्या रस्त्यावरुन आम्ही एक बंदूक जप्त केली आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. जखमींचे वय २७ ते ६१ वर्षांच्या दरम्यान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT