Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

पेट्रोल-डिझेलचे नवीन भाव जाहीर; जाणून घ्या आपल्या महानगरातील भाव

गेल्या काही दिवसांपासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: गेल्या काही दिवसांपासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. परंतु, आज मात्र पेट्रोल डिझेलच्या (diesel) भावात कोणती देखील वाढ करण्यात आली नाही. दिल्लीमध्ये १ लिटर पेट्रोल १०५.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९६.६७ रुपये प्रतिलिटर मिळत आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलचे भाव १२०.५१ रुपये आणि डिझेलचे भाव १०४.७७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत ११५.११२ रुपये आहे, तर डिझेलची किंमत ९९.८३ रुपये प्रति लीटर आहे. त्यावेळी, चेन्नईमध्ये पेट्रोल ११०.८५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल १००.९४ रुपये प्रति लिटर आहे. मागील वर्षी ४ नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या भावात कोणती वाढ झाली नाही.

हे देखील पहा-

प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव-

दिल्ली ९६.६७/१०५.४१

मुंबई १०४.७७/१२०.५१

कोलकाता ९९.८३/ ११५.१२

चेन्नई १००.९४/११०.८५

अशा प्रकारे घरबसल्या इंधनाचे भाव तपासा-

या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT