Unrest in Nepal sparks concerns over India’s economy and border security. saam tv
देश विदेश

Nepal Protest: नेपाळमधील अस्थिरतेचा भारतावर काय होणार परिणाम? अर्थव्यवस्था अन् देशाची सुरक्षेवर संकट

Protest In Nepal : नेपाळमधील सध्याच्या अशांततेमुळे भारताची चिंता वाढलीय. नेपाळमधील संकटाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, व्यापारावर आणि सीमा सुरक्षेवर परिणाम होईल का? या परिणामाचे सविस्तर विश्लेषण येथे आहे.

Bharat Jadhav

  • नेपाळमध्ये जेन-जी आंदोलनामुळे अराजकता व अस्थिरता वाढली.

  • भारत-नेपाळ व्यापार व दैनंदिन गरजांवर याचा परिणाम होऊ शकतो.

  • सीमावर्ती सुरक्षेवर धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते.

  • भारत-नेपाळ संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता.

नेपाळमध्ये चालू असलेल्या जेन-जी आंदोलनकर्त्यांनी संपूर्ण देशात अस्थिरता आणि अराजकता वाढवलीय. नेपाळमधील या हिंसक आंदोलनाचा भारतावर काय परिणाम होणार आहे. दोन्ही देशाचे संबंध सर्वात चांगले असल्याचं म्हटलं जात आहे, त्याचमुळे नेपाळ देशात आंदोलन पेटल्यानं भारतावरही याचा काय परिणाम होणार होणार आहे. नेपाळ आपल्या दैनंदिन गरजांसाठी भारतावर अवलंबून आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेसह सुरक्षेला धोका निर्माण होणार का असा प्रश्न केला जात आहे.

भारताचे शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये तणावपूर्व स्थिती निर्माण झालीय. सोशल मीडिआ बंद केल्यानंतर येथील सत्तापालट झाले आहे. येथील सरकारने ४ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर येथील आंदोलनाची धार वाढली. जगभरात या आंदोलनाची चर्चा होऊ लागलीय. पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडाल यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. दरम्यान आता देशाच्या स्थितीवर लष्कराने नियंत्रण मिळवलंय. पण या आंदोलनाचा भारतावर काय परिणाम होणार आहे, हे जाणून घेऊ.

भारत-नेपाळचे व्यापार संबंध मजबूत

भारत आणि नेपाळ दरम्यान व्यापार संबंध खूप मजबूत आहेत. नेपाल भारताकडून तेल, वीज, औषधे आणि इतर सेवा घेतो. नेपाळमधील अनेक प्रोजेक्ट भारताचे आहेत. येथील रोजगारही त्यामुळे वाढलाय. नेपाळ भारताचा सर्वात मोठा व्यापारातील भागीदार आहे. पण आंदोलनामुळे दोन्ही देशातील आयात-निर्यात ठप्प होऊ शकतो.

इंफ्रास्ट्रक्चर आणि पावर प्रोजेक्ट्स रखडणार

हिंसक आंदोलनामुळे देशातील मोठं-मोठे प्रकल्प रखडत असतात. नेपाळमध्ये अनेक हायड्रोपावर प्रोजेक्ट्स सुरू आहेत. ट्रान्समिशन लाइनिंगचे काम होत आहे. त्यामुळे देशातील तणावामुळे ही प्रोजेक्ट रखडत असतात. जर कोणतेही प्रकल्प सुरू होणार असतील तर ते राजकीय अस्थिरतेमुळे थांबू शकतात किंवा त्यांना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो.

पर्यटन उद्योगावर परिणाम

आंदोलनामुळे पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. नेपाळमधील पर्यटनावर आंदोलनाचा मोठा परिणाम होणार आहे. भारतातील लोक येथील हॉटेल बुकिंग करत असतात. ट्रॅव्हल कंपन्या आणि एअरलाइन इंडस्ट्रीला मठा फटका बसू शकतो.

भारतासाठी असुरक्षा

भारत-नेपाळमधील सीमा साधारण १,७५० किलोमीटर अंतर आणि बुहतेक सीमा खुली आहे. हिंसा आणि अस्थिरतेमुळे हत्यार, तस्करी, स्मगलिंग सारख्या कारवाया वाढत असतात. यामुळे भारताच्या सीमेवर गस्ती वाढवावी लागेल.

भारताची अर्थव्यवस्था संकटात

शेजारील देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका भारताचे व्यापारीक भागीदार आहेत. वाढत्या अस्थिरतेमुळे व्यापार मंदावत असतो. भारतासाठी हीदेखील चिंतेची बाब आहे, कारण सध्या भारताला अमेरिकेच्या ५०% शुल्काचा फटका बसतोय. यामुळे व्यापाऱ्यांना आधीच मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आता नेपाळमध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे तेथील निर्यातदारांनाही नुकसान, वस्तूंच्या वितरणात विलंब होऊ शकतो.

भारताच्या शेजारीअनेक देश आहेत. तेथे एक हिंसाचार आणि अस्थिरता होणं ही पहिली वेळ नाहीये. गेल्या काही वर्षांत बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानमध्येही अशा परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बांगलादेश ते भारतापर्यंतच्या वस्त्र आणि कापड पुरवठा साखळीवर परिणाम झाला. त्याच वेळी, श्रीलंकेतील अस्थिरतेनंतर तेल, पायाभूत सुविधा आणि बँकिंग सुविधा संकटात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga Prediction: दोन महिन्यात भारतात महापूर,भूस्खलन व तापमान वाढ; कोणी दिला इशारा?

Konkan Mhada House : म्हाडाच्या घरांसाठी अर्जांचा पाऊस; सानपाड्यातील २ घरांसाठी तब्बल ६१५६ अर्ज, प्राइम लोकेशन आहे तरी कुठं?

Gautam Patil : गौतमी पाटीलला अटक होणार? 'ते' प्रकरण अंगलट येणार, नेमकं काय घडलं होतं?

Maharashtra Politics: आता उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, शेतकऱ्यांसाठी ठाकरे रस्त्यावर उतरणार?

Mumbai Crime: आरे कॉलनीत डान्सरवर बलात्कार; सराव करताना नृत्य प्रशिक्षकाची नियत फिरली, दारू पाजली नंतर...

SCROLL FOR NEXT